मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात आरोपी असलेली अभिनेत्री या चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांच्या संदर्भात सीबीआयकडून लूक आउट नोटीस 2020 पासून जारी करण्यात आली होती. त्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आदेश दिले की, "आता यापुढे लूक आऊट नोटीस कार्यरत राहू शकत नाही. त्यामुळे ही नोटीस रद्द करीत आहोत;" असे म्हणत न्यायमूर्ती रेवती मोहिते आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने रिया चक्रवर्तीला दिलासा तर सीबीआयला मोठा दणका दिलेला आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणांमध्ये सीबीआयकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौक चक्रवर्ती आणि वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांच्या विरोधात 2020 मध्ये गुन्हा दाखल केला होता. आणि त्यानंतर त्याच्या आधारे सीबीआयकडून या कुटुंबियांच्या विरोधात लूक आउट नोटीस जारी केली होती. यामुळे रिया चक्रवर्तीला परदेशात व्यावसायिक कामाच्या निमित्ताने जाण्यात सातत्याने अडथळा होत होता.
रिया चक्रवर्ती विरोधात चार आठवड्याची स्थगितीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली - रिया चक्रवर्तीकडून या लूक आउट नोटीसला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या लुक आऊट नोटीसला रद्दबातला ठरवले आहे. या नोटीस विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी चार आठवड्याची स्थगिती द्यावी, ही मागणी सीबीआयाने केली होती. ती देखील उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे. यामुळे चक्रवर्ती कुटुंबीयाला मोठा दिलासा मिळालेला आहे. रिया आणि तिचा भाऊ यांना न्यायालयाने याआधीच जामीन मंजूर केलेला आहे ते जामिनावर सध्या बाहेर आहेत.
सुशांत सिंग राजपूत हा उगवता अभिनेता म्हणून नावारूपाला आला होता.14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या निवासस्थानी तो मृत अवस्थेमध्ये आढळला. पोलिसांनी या मृत्यूची अपघाती नोंद केली आणि प्रकरणाची चौकशी केली. त्यावेळेला अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सुशांत शीतला आत्महत्या साठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला गेला होता. त्याबाबत बिहार येथील संबंधित पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली होती आणि ती तक्रार नंतर सीबीआय कडे वर्ग करण्यात आली होती. त्यामुळे सीबीआयने लुक आऊट नोटीस तेव्हापासून रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ तसेच तिचे वडिलांच्या विरुद्ध जारी केले होते.
हेही वाचा -