ETV Bharat / entertainment

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' बॉक्स ऑफिसवर रिलीज - फायटर

Fighter Movie : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनीत 'फायटर' हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे.

Fighter Movie
फाइटर चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2024, 1:33 PM IST

मुंबई Fighter Movie : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' हा आज 25 जानेवारी रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 2024चा पहिला ब्लॉकबस्टर ठरणार आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनीत 'फायटर'ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस हा चित्रपट गुरुवारी म्हणजेच आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अनेकजण खुश आहेत. 'फायटर' चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी चित्रपटगृहांमध्ये पाहिला मिळत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे.

राकेश रोशननं दिली 'फायटर' चित्रपटावर प्रतिक्रिया : राकेश रोशननं हृतिक रोशनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फायटर' चित्रपटाचा रिव्ह्यू त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. राकेश रोशन यांनी हृतिकच्या चित्रपटाला 'सर्वोत्तम' म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी हृतिक, दीपिका, अनिल कपूर आणि सिद्धार्थ आनंदला सर्वोत्कृष्ट म्हटलं आहे. 'फायटर'मध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यासोबतच या दोन स्टार्सची केमिस्ट्रीही सगळ्यांनाच आवडली आहे. याशिवाय सोशल मीडियावर काहीजण 'फेव्हरेट कपल' असल्याचं या जोडीला म्हणत आहेत. चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणारे नेटिझन्सनीही सोशल मीडियावर त्यांचे रिव्ह्यू शेअर करत आहे. हृतिक रोशन स्टारर 'फायटर'ला कौतुक करत चाहते 'ऑल टाईम ब्लॉकबस्टर' चित्रपट म्हणत आहेत.

'फायटर' रिलीज : 'फायटर' चित्रपटाची क्रेझ सध्या पाहायला मिळत आहे. चाहते 'फायटर' पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचत असताना, ते सोशल मीडियावर मूव्ही हॉलच्या आतील भागातील फोटो देखील शेअर करत आहेत. 'फायटर' या चित्रपटाचे आगाऊ बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले आहे. सॅकनिल्‍कच्या रिपोर्टनुसार 'फायटर'च्या आगाऊ बुकिंगनं देशभरात 279367 तिकिटे विकली गेली आहेत. या चित्रपटानं रिलीजपूर्वीच 8.4 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आगाऊ बुकिंगचे आकडे पाहता, पहिल्या दिवशी हा चित्रपट 25 ते 30 कोटी रुपयांची कमाई करू शकतो. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटीचं लवकरच लक्ष गाठेल असं सध्या दिसत आहे.

हेही वाचा :

  1. प्रियांका चोप्रानं 'बिग बॉस 17'च्या अंतिम फेरीपूर्वी मन्नारा चोप्राला दिला पाठिंबा
  2. बॉबी देओलनं पत्नी तान्या देओलसोबतचा सुंदर फोटो शेअर करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
  3. ऑस्कर नामांकनात निशा पाहुजा दिग्दर्शित 'टू किल अ टायगर' ची झाली एंट्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.