मुंबई - Fighter Box Office: हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत. असे असले तरी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवण्यासाठी झगडावे लागत आहे. 25 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये सुरू झालेल्या सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' चित्रपटाची लाँग वीकेंड संपल्यापासून कमाईत घसरण सुरू झाली आहे. गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी कमाईचा आकडा आणखी खूपच कमी रोहिला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मतानुसार, 'फायटर' रिलीज झाल्यापासून आठ दिवसांत भारतात 146 कोटी रुपयांची कमाई करेल असा अंदाज होता. पहिल्या दिवशी या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 22.5 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 39.5 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 27.5 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 29 कोटी रुपये कमावले. 'फायटर'ने पाचव्या दिवशी भारतात ८ कोटी रुपये, सहाव्या दिवशी ७.५ कोटी आणि सातव्या दिवशी ६.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
8 व्या दिवशी सर्व भाषांमध्ये चित्रपटाने भारतात 5.75 कोटी रुपयांची कमाई करण्याची अपेक्षा आहे. सातव्या दिवसापासून ही जवळपास एक कोटींची घसरण दिसत आहे. चित्रपटाची एकूण देशांतर्गत कमाई सध्या 146.25 कोटी रुपये इतकी आहे. गुरुवारी, एरियल अॅक्शनर असलेल्या या चित्रपटाचा एकूण हिंदी ऑक्युपन्सी रेट 11.33% इतका होता.
फायटरमध्ये ऋतिक आणि दीपिका व्यतिरिक्त मुख्य भूमिकेत अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात स्क्वॉड्रन लीडर शमशेर पठानिया उर्फ पॅटीच्या भूमिकेत हृतिक, स्क्वॉड्रन लीडर मीनल राठौर किंवा मिन्नी म्हणून दीपिका पदुकोण आणि ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग उर्फ रॉकीच्या भूमिकेत अनिल कपूर हे सर्व आपल्या देशासाठी लढताना दिसत आहेत. हृतिक आणि दीपिकाचा हा ऑन-स्क्रीन पहिलाच चित्रपट आहे.
हा चित्रपट हृतिक आणि दीपिकाचा सिद्धार्थ आनंदसोबतचा तिसरा चित्रपट आहे. हृतिकने यापूर्वी 'बँग बँग' आणि 'वॉर' या चित्रपट सिद्धार्थसोबत काम केले होते. दीपिकाने याआधी त्याच्यासोबत 'बचना ए हसीनों' आणि 'पठान'मध्ये काम केले आहे. या चित्रपटाला त्याच्या चाहत्यांकडून खूप चांगले प्रतिसाद मिळाले आहेत.
हेही वाचा -