ETV Bharat / entertainment

'फायटर'नं अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली जबरदस्त कमाई - फायटर

Fighter Advance Booking Day 1 : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनीत 'फायटर'चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झालंय. या चित्रपटानं अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे.

Fighter Advance Booking Day 1
फायटर अ‍ॅडव्हान्स बुकिंग दिवस 1
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2024, 3:14 PM IST

मुंबई - Fighter Advance Booking Day 1 : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण स्टारर चित्रपट 'फायटर'चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. 'फाइटर' हा 2024 मधील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज झाल्यापासून चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान 'फायटर'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या दिवशी या चित्रपटानं आतापर्यंत किती कोटीचा गल्ला जमा केला हे जाणून घेऊया.

पहिल्या दिवसाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर'मध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणची ऑनस्क्रीन रोमँटिक केमिस्ट्री पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग मोठ्या प्रमाणात झाली आहे. सॅकनिल्‍कच्या रिपोर्टनुसार 'फायटर'नं आत्तापर्यंत 3.74 कोटी रुपये आगाऊ बुकिंगमध्ये व्यवसाय केला आहे. या चित्रपटाची एकूण 116715 तिकिट विक्री झाली आहे. 'फायटर' चित्रपटाचे एकूण शो 8779 असणार आहेत. 'फायटर'च्या 2डी व्हर्जनसाठी 46527 तिकिट विकली गेली आहे.

'फायटर'ची स्टारकास्ट : याशिवाय थ्रीडी व्हर्जनसाठी 62530 तिकिटांची विक्री झालीआहेत. इमर्सिव्ह आयमॅक्स थ्रीडीसाठी 6048 तिकिट विक्री झाली असून फोर-डी आणि थ्रीडीसाठी 1610 तिकिटांची विक्री झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाला सेंट्रल बोर्डनं काही दृश्यांमध्ये बदल करण्यास सांगितला आहे. 'फायटर'ला 'यूए' (U/A) प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. या चित्रपटाचा रनटाइम 166 मिनिटांचा असेल. हा चित्रपट 250 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणशिवाय करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख, अनिल कपूर, तलत अजीज, संजीव जयस्वाल, ऋषभ साहनी आणि आशुतोष राणा यांसारखे कलाकार आहेत. 'फायटर'ची निर्मिती वायकॉम 18 स्टुडिओ आणि मार्फलिक्स पिक्चर्स यांनी केली आहे.

हेही वाचा :

  1. चित्रीकरणादरम्यान सैफ अली खानला दुखापत, गुडघा आणि खांद्यावर झाली शस्त्रक्रिया
  2. श्रीराम मंदिरच्या उद्घाटन सोहळ्यातील आकाश अंबानी आणि श्लोकाचा फोटो झाला व्हायरल
  3. रणबीर-आलिया ते विकी-कतरिना स्टार कपल प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येत हजर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.