मुंबई - Don 3 : अभिनेता रणवीर सिंग स्टारर ॲक्शन-थ्रिलर चित्रपट 'डॉन 3'बाबत एक अपडेट समोर येत आहे. या चित्रपटामधील मुख्य अभिनेत्रीचे नाव आता समोर आले आहे. ' डॉन 3' चित्रपटाचे निर्माते, फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी 19 फेब्रुवारी रोजी चाहत्यांना वचन दिले होते की ते 'डॉन 3'मधील मुख्य अभिनेत्रीचे नाव उघड करतील आणि आज निर्मात्यांनी वचन पूर्ण केले आहे. 'डॉन 3' या चित्रपटामध्ये रणवीर सिंगबरोबर कियारा अडवाणी दिसणार आहे. आज 20 फेब्रुवारी रोजी ' डॉन 3'च्या निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
कियारा 'डॉन 3'ची नायिका : 8 ऑगस्ट 2023 रोजी फरहान अख्तरनं एक टीझर शेअर करून 'डॉन 3' ची घोषणा केली होती. 'डॉन 3' चित्रपटाचा आणखी एक टीझर शेअर करून त्यांनी स्पष्ट केले की, शाहरुख खान ऐवजी 'डॉन 3'मध्ये रणवीर सिंग असेल. आता रणवीर सिंग हा हिंदी चित्रपटसृष्टीचा तिसरा डॉन बनणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर त्याचा दमदार अभिनय करताना दिसणार आहे. दरम्यान फरहान अख्तरने 'डॉन 3'चा टीझर रिलीज केला, ज्यामध्ये रणवीर हा डॉनच्या भूमिकेत दिसत आहे. सुमारे 2 मिनिटांच्या टीझरमध्ये तो म्हणतो, हे सर्व लोक विचारतात की झोपलेला वाघ कधी जागा होणार, त्यांना सांगा की मी जागा झालो आहे, माझी ताकद काय आहे, माझी हिम्मत काय आहे. पुन्हा एकदा दाखविण्यासाठी आलो आहे. मृत्यूशी खेळणे हे माझे जीवन आहे. 11 देशांचे पोलीस माझा शोध घेत आहेत, पण मला पकडण्यात कोण यशस्वी झाले नाही, मी आहे डॉन.'' रणवीरचा हा टिझर चाहत्यांना खूप आवडला आहे.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : 'डॉन 3' चित्रपटाचं दिग्दर्शन फरहान अख्तर करत आहे. एक्सेल एंटरटेनमेंटचे मालक रितेश सिधवानी यांनी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. रणवीर सिंग स्टारर चित्रपट 'डॉन 3' 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होईल. दरम्यान 2006 मध्ये फरहान आणि रितेशने शाहरुख खानला घेऊन 'डॉन'चा रिमेक 'डॉन 2' हा चित्रपट 2011 मध्ये बनवण्यात होता.
हेही वाचा :