ETV Bharat / entertainment

'डॉन 3'साठी शूटिंग लोकेशनच्या शोधात लंडनमध्ये पोहोचला फरहान अख्तर - Farhan Akhtar Don 3 - FARHAN AKHTAR DON 3

Farhan Akhtar Don 3 : रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी 'डॉन 3' चित्रपटाच्या शूटिंगसाठी फरहान अख्तर लंडनला पोहोचला आहे. 'डॉन 3' चे शूटिंग कधी सुरू होणार आणि कधी संपणार हे जाणून घेण्यासाठी वाचा .

Farhan Akhtar
फरहान अख्तर (Farhan Akhtar Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 3, 2024, 6:18 PM IST

मुंबई - Farhan Akhtar Don 3 : अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर आणि एक्सेल एंटरटेनमेंटच्या 'डॉन 3' चित्रपटाचे लेटेस्ट अपडेट मिळाले आहे. 'डॉन 3' मध्ये एन्ट्री केल्यापासून रणवीर सिंग चर्चेत आहे. मधल्या काळात हा चित्रपट शाहरुख खान ऐवजी रणवीर सिंग करणार असल्यामुळे चर्चेत होता. आता या चित्रपटाच्या प्रत्यक्ष शूटिंगला सुरूवात करण्याची वेळ झाली असून यासाठी उत्तम लोकेशन्सचा शोध निर्मात्यांनी जारी ठेवलाय. विशेष म्हणजे, फरहान अख्तर 'डॉन 3' चित्रपटासाठी लंडनला पोहोचला आहे. येथून तो जर्मनीलाही जाणार आहे. 'डॉन 3' या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन आणि जर्मनीमध्ये होणार आहे.

चित्रपटासंबंधी उपलब्ध माहितीनुसार या चित्रपटाचे शूटिंग लंडन आणि जर्मनीमध्ये होणार आहे. शूटिंग लोकेशनच्या शोधात फरहान इथपर्यंत पोहोचला आहे. त्याचवेळी चित्रपटाची टीम लंडनला पोहोचणार आहे. दिग्दर्शक फरहान अख्तर लवकरच लोकेशन शोधून शूटिंग सुरू करणार आहे. माहितीनुसार चित्रपटाचे शूटिंग ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे.

कधी संपणार 'डॉन 3' चे शूटिंग ?

लोकेशन शोधल्यानंतर 'डॉन 3' चे शूटिंग ऑगस्ट 2024 मध्ये सुरू होईल आणि डिसेंबर 2024 मध्ये चित्रपट पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. रणवीर सिंग खलनायकाच्या भूमिकेत दिसणार ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी तो त्याची पत्नी दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर स्टारर 'पद्मावत' चित्रपटात अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसला होता. यावेळी 'डॉन 3' या चित्रपटात कियारा अडवाणी रणवीर सिंगबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'डॉन 3' हा डॉन फ्रँचायझीमधील तिसरा भाग आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 'डॉन' 2006 मध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये शाहरुख खान 'डॉन'च्या भूमिकेत होता. त्याच्या बरोबर अर्जुन रामपाल, करीना कपूर खान आणि प्रियांका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर 2011 मध्ये 'डॉन'चा दुसरा भाग प्रदर्शित झाला. यामध्ये शाहरुख खानबरोबर प्रियांका चोप्रा, बोमन इराणी, ओम पुरी यांच्या भूमिका होत्या. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत उतरणार आहे, तर कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे.

रणवीर सिंगच्या आगामी प्रोजेक्टमध्ये 'सिंघम 3' हा चित्रपट सिंघम फ्रँचायझीमधील तिसरा सीक्वेल आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात, रणवीर सिंग इन्स्पेक्टर संग्राम भालेराव उर्फ सिम्बाच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. 'सिंघम 3' यावर्षी 15 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा -

'मिनिमम' चित्रपटाचा प्रीमियरच्या निमित्तानं हृतिक रोशननं केलं सबा आझादच्या टॅलेंटचे कौतुक - HRITHIK ROSHAN

एसएस राजामौलीचे ओटीटी पदार्पण : 'बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड' सिरीजचा ट्रेलर आऊट - SS Rajamoulis OTT Debut

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी अभिनीत 'जॉली एलएलबी 3'ची शुटिंग सुरू - AKSHAY KUMAR AND ARSHAD WARSI

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.