ETV Bharat / entertainment

भारत-चीन युद्धाला 62 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल फरहान अख्तरनं '120 बहादूर'चा फर्स्ट लूक केला रिलीज - FARHAN AKHTAR

भारत-चीन युद्धावर आधारित '120 बहादूर' चित्रपटातील फरहान अख्तरचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

farhan akhtar
फरहान अख्तर (फरहान अख्तरचा फर्स्ट लूक (Film Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 18, 2024, 5:16 PM IST

मुंबई : अभिनेता फरहान अख्तरनं यावर्षी 4 सप्टेंबर रोजी युद्धावर आधारित चित्रपट '120 बहादूर'ची घोषणा करून त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली होती. आज 18 नोव्हेंबर रोजी '120 बहादूर'मधील फरहान अख्तरचं फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 1962 मध्ये भारत आणि चीन यांच्यातील युद्धावर आधारित असणार आहे. '120 बहादूर' या चित्रपटामध्ये फरहान अख्तर हा भारतीय सैनिकाच्या भूमिकेत असणार आहे. आता फरहान अख्तरनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर या चित्रपटामधील फर्स्ट लूक शेअर केले आहे. हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित होणार याबद्दल देखील माहिती समोर आली आहे. '120 बहादूर' या चित्रपटातील फरहान अख्तरचा फर्स्ट लूक खूप दमदार आहे. दरम्यान भारत-चीन युद्धाला 62 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं फरहाननं '120 बहादूर' चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

'120 बहादूर'मधील फरहान अख्तरचं फर्स्ट लूक रिलीज : चित्रपटामधील फर्स्ट लूक शेअर करताना फरहाननं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, '62 वर्षांपूर्वी 18 नोव्हेंबर 1662 रोजी भारत आणि चीनमध्ये रेजांगला युद्ध झाले होते. यामध्ये 120 शूरवीरांनी, हजारो सैनिकांना टक्कर दिली होती. भारतीय जवानांच्या शौर्याची कहाणी इतिहासात त्यांच्या रक्तानं लिहिली आहे. या वीरांच्या सन्मानार्थ आम्ही मेजर शैतान सिंग यांच्या धैर्याला सलाम करतो, जे प्रतिकूल परिस्थितीत शत्रूसमोर खंबीरपणे उभे राहिले, त्यांची कहाणी सदैव आपल्या आठवणीत असेल. याशिवाय अहीर समाजाला विशेष सलाम, या युद्धात त्याच्या समाजामधील मुलांनी राष्ट्र रक्षासाठी अतुलनीय शौर्य दाखवले.'

'120 बहादूर' चित्रपटाबद्दल : या चित्रपटात परमवीर चक्र पुरस्कार विजेते मेजर शैतान सिंग आणि चार्ली कंपनी तसेच कुमाऊँ रेजिमेंटच्या सैनिकांचे धैर्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रेजांगची लढाई भारत आणि चीन यांच्यात झाली होती. रजनीश घई '120 बहादूर' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. राजीव मेनन यांनी चित्रपटाची कहाणी आणि पटकथा लिहिली आहे. '120 बहादूर'चे संवाद सुमित अरोरा हे लिहित आहेत. अमित त्रिवेदी या चित्रपटाला संगीत देणार आहेत. याशिवाय या चित्रपटामधील गाणी जावेद अख्तर लिहित आहेत. '120 बहादूर' चित्रपटाचे निर्माते फरहान अख्तर, रितेश सिधवानी आणि अमित चंद्रा हे आहेत. सध्या या चित्रपटातील उर्वरित स्टारकास्टचे चेहरे समोर आलेले नाहीत. हा चित्रपट 2025 साली रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. फरहान अख्तरनं '120 बहादूर' चित्रपटाची केली घोषणा, मोशन पोस्टर रिलीज - 120 bahadur movie
  2. जान्हवी, फरहान, राजकुमार रावसह बॉलिवूड सेलेब्रिटींनी मुंबईत केलं मतदान - Lok Sabha Election 2024
  3. फरहान अख्तरने शेअर केली 'डॉन ३' च्या शूटिंग लोकेशनची झलक - Farhan Akhtar Don 3

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.