ETV Bharat / entertainment

बॉलिवूडची गाणी आणि दृष्यातून सजलेला 'व्हॅलेंटाईन्स वीक'चा प्रत्येक दिवस - व्हॅलेंटाईन्स डे

Valentines Week : जसजसा 'व्हॅलेंटाईन्स डे' उजाडत जातो तसतसे 'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये मागे पडलेले दिवसही प्रेमी युगुलांना आठवणीत राहतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी वाहिलेला या आठवड्यातील प्रत्येक दिवस बॉलिवूडमधील गाणी आणि दृष्यातून साजरा झाला आहे. यावरच एक नजर आपण टाकूयात.

Valentine's Week
व्हॅलेंटाइन्स वीक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 1:24 PM IST

मुंबई - Valentines Week :'व्हॅलेंटाइन्स वीक' संपत आल्याने या आठवड्याचा समारोप खास बॉलिवूड स्टाईलनं निरोप देऊन करुयात. हृदयाच्या आकाराचे फुगे हवेत उडवण्यापूर्वी आणि चॉकलेट्सच्या रॅपर्सवर धूळ बसण्यापूर्वी या आठवड्याचा प्रत्येक दिवस हिंदी चित्रपटांमधील दृश्ये आणि गाण्यांसह आठवडाभराचा एक सिनेमॅटिक प्रवास अनुभव घेऊयात.

व्हॅलेंटाईन वीक हा एक असा काळ आहे जेव्हा लोक त्यांच्या खास प्रेमाच्या व्यक्तीबद्दल त्यांचे प्रेम आणि कौतुक प्रत्यक्ष भेटून, शुभेच्छा पाठवून किंवा भेटवस्तूच्या माध्यमातून व्यक्त करतात. या आठवड्याच्या शेवट 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या उत्साही सेलेब्रिशनने होतो. जसजसा आठवडा संपत आला, तसतसे अनेक प्रेमकथा सुरू झाल्या आहेत. तरुण प्रेमी अंतःकरणाने त्यांचे प्रेम साजरे करण्यासाठी व्हॅलेंटाईन डेची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेकांसाठी, हा आठवडा आश्चर्याने, भेटवस्तूंनी आणि आनंदाने भरलेला असतो आणि ते आपल्या प्रिय व्यक्तींवर प्रेमाचा वर्षाव करतात.

प्रेमी जर आधीच प्रेमात पडले असेल किंवा आपल्या क्रशला प्रपोज करण्याचे साहस दाखवले असेल तर ते व्हॅलेंटाईन वीकची खूप आतुरतेनं प्रतीक्षा करत असतात. व्हॅलेंटाईन्स डे पर्यंतच्या सात दिवसांमध्ये रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि शेवटी व्हॅलेंटाईन डे यांचा समावेश होतो. दरवर्षी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत हा प्रेमाचा सण साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन्स वीकच्या गुलाबी रंगाचे धुके कायम राखत हिंदी चित्रपटातील गाण्यांसह काही दृष्ये पुन्हा पाहूयात.

रोझ डे (फेब्रुवारी 7): रोज डे व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात एका छानशा प्रेम भावनेतून होत असते. यामध्ये प्रेमी गुलाब भेट देऊन त्यांच्या भावना व्यक्त करतात. 'मिशन कश्मीर'मधील एक मार्मिक दृश्य रोज डेचे सार सुंदरपणे कॅप्चर करते. 'छुपके से सुन' या गाण्यात अलताफ खान ही भूमिका साकारत असलेला हृतिक रोशन त्याची प्रेयसी सुफिया परवेझला ( प्रीती झिंटा ) एक गुलाब देतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

प्रपोज डे (8 फेब्रुवारी): प्रपोज डेच्या दिवशी लोक त्यांचे प्रेम व्यक्त करण्याचे धैर्य वाढवतात. 'शेरशाह' चित्रपटात असे दृष्ये आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये कियारा अडवाणीच्या पात्राला प्रपोज करण्यासाठी सिद्धार्थ मल्होत्राची व्यक्तिरेखा गुडघ्यापर्यंत झुकल्याचा सीन आपल्याला सिनेमात पाहायला मिळाला होता. विशेष म्हणजे खऱ्या आयुष्यात कियाराला प्रपोज करताना सिद्धार्थने रोममधील 'शेरशाह' सीन रिक्रिएट केला होता.

चॉकलेट डे (9 फेब्रुवारी): गोड आनंदाने साजरा केला जाणारा चॉकलेट डे प्रेमींना प्रत्येकाच्या आवडत्या ट्रीटद्वारे आपुलकी व्यक्त करू देतो. 'हम आपके है कौन मधला एक सीन'..आपल्याला याची आठवण करुन देतो. यामध्ये सलमान खानचे पात्र माधुरी दीक्षितला आपलं बनवण्यासाठी चॉकलेटसह आपली प्रेमभावना व्यक्त करते.

टेडी डे (फेब्रुवारी 10): टेडी डे म्हणजे प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक असलेल्या प्रिय व्यक्तींना प्रेमळ भेट देणे. 'स्त्री' चित्रपटात, राजकुमार रावच्या पात्राने श्रद्धा कपूरच्या पात्रासाठी एका फनफेअरमध्ये एक विशाल टेडी बेअर जिंकला आणि तिला भेटवस्तू म्हणून दिला. ही गोष्ट टेडी बियरचे कायमस्वरूपी आकर्षण दर्शवते.

प्रॉमिस डे (फेब्रुवारी 11): प्रॉमिस डेच्या दिवशी प्रेमी जोडपे एकमेकांशी त्यांच्या वचनबद्धतेची हमी देते. 'मैं प्रेम की दिवानी हूं'मधील 'कसम की कसम' या गाण्यातून आपल्याला वचने आणि शाश्वत प्रेमाची अनुभूती देते.

हग डे (१२ फेब्रुवारी): एक उबदार मिठी खूप काही बोलून जाते. या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारुन आपुलकी शेअर करत असतात. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटातील शाहरुख खान आणि काजोल यांच्यातील मिठीचे दृश्य प्रेमाची शाश्वत अभिव्यक्ती म्हणून आपल्या हृदयात कायमचे कोरले गेले आहे.

किस डे (फेब्रुवारी 13): चुंबन जवळीक आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि या दिवशी जोडपे प्रेमळ क्षण शेअर करतात. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मधील कतरिना कैफ आणि हृतिक रोशन यांच्यातील हृदयस्पर्शी चुंबन दृश्य भावनांची खोली सुंदरपणे टिपताना आपण पाहिले आहे.

व्हॅलेंटाईन डे (फेब्रुवारी 14): शेवटी 'व्हॅलेंटाईन्स डे'चा दिवस आला, जगभरात प्रणय आणि प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. कार्ड्स आणि फुलांची देवाणघेवाण असो किंवा रोमँटिक डिनरचा आनंद असो, जोडपे प्रेमाच्या दिवशी त्यांचे बंध जपतात. शाहरुख खानच्या 90 आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील रोमँटिक चित्रपटांपेक्षा या दिवसाचा सारांश कोणता असेल जो प्रेम आणि भक्तीचे प्रतीक आहे?

व्हॅलेंटाईन्स वीक संपला असला तरी प्रेमानं विणलेल्या अनेक कथा आपल्याला बॉलिवूडमध्ये आगामी काळात पाहायला मिळणार आहेत. आपण त्यांची प्रतीक्षा करत प्रेमानं राहूयात.

हेही वाचा -

  1. 'व्हॅलेंटाईन्स डे'निमित्त पाहा काही विशेष रोमँटिक चित्रपट
  2. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसूने दिल्या त्यांच्या 'व्हॅलेंटाईन फॉरएव्हर'ला शुभेच्छा
  3. वरुण तेज स्टारर 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'ची टीम पुलवामा स्मारक स्थळाला भेट देणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.