ETV Bharat / entertainment

थलपथी विजय स्टारर 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' होणार ओटीटीवर प्रदर्शित... - GOAT ON NETFLIX - GOAT ON NETFLIX

GOAT Movie On OTT: साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय अभिनीत ॲक्शन ड्रामा 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' हा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. विजयच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 400 कोटीची कमाई कमी वेळात केली आहे.

GOAT Movie On OTT
गोट चित्रपट ओटीटीवर (Netflix Confirms Thalapathy Vijay Starrer The Greatest Of All Time's OTT Release Date (Photo: Trailer Screengrab))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 1, 2024, 2:32 PM IST

मुंबई -GOAT Movie On OTT: बॉक्स ऑफिसवर धमाल केल्यानंतर, थलपथी विजय स्टारर ॲक्शन चित्रपट 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' (GOAT)आता ओटीटीवर प्रसारित होणार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. आता 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' चित्रपट प्रेक्षकांच्या मोबाईल आणि टीव्हीपर्यंत पोहोचत आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर दिसल्यानंतर ओटीटीवर येत आहे. विजय अभिनीत आणि व्यंकट प्रभू दिग्दर्शित 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' चित्रपट कुठल्या प्लॅटफॉर्मवर येत आहे. याबद्दल जाणून घ्या...

'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' कधी आणि कुठे दिसणार? : विजयचा 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम'ऑक्टोबरमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर येत आहे. हा चित्रपट ओटीटीवर हिंदी तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तामिळमध्ये उपलब्ध असेल. आता विजयचे अनेक चाहते चित्रपट पाहण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर एका पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. यामध्ये असं आहे की, चित्रपटाची थिएटर आवृत्ती ओटीटीवर प्रसारित होईल. 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर आपले 25 दिवस पूर्ण केले आहेत. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 400 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' चित्रपटामधील स्टारकास्ट : तामिळनाडूमध्ये अजूनही 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होताना दिसत आहे. या चित्रपटात विजय दुहेरी भूमिकेत आहे. त्यानं यात वडील आणि मुलाची भूमिका साकारली आहे. विजय व्यतिरिक्त 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' चित्रपटात प्रभुदेवा, मोहन, स्नेहा, जयराम, लैला, प्रशांत, अजमल अमीर आणि मीनाक्षी चौधरी यांच्यासह अनेक स्टार्स महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' चित्रपट 400 कोटीच्या बजेटमध्ये निर्मित करण्यात आला आहे. थलपथी विजयचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटामध्ये त्यानं धमाकेदार अ‍ॅक्शन सीन्स केले आहेत. दरम्यान विजय कामबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'लियो' या चित्रपटामध्ये दिसला होता. आता पुढं तो 'थलपती 69'मध्ये दिसणार आहे. सध्या या चित्रपटाला शीर्षक दिलं गेलं नाही. लवकरच या चित्रपटाबद्दल अपडेट समोर येणार आहे.

हेही वाचा :

  1. थलपथी विजय स्टारर 'गोट'नं केली पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई - box office collection
  2. थलपथी विजय स्टारर 'गोट' रुपेरी पडद्यावर झळकला, जगभरातील चाहते खुश - Vijay Thalapathy\
  3. थलपथी विजय स्टारर 'गोट'च्या मॉर्निंग शोसाठी याचिका दाखल, निर्णय येणं बाकी - vijay Movie

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.