ETV Bharat / entertainment

90 वर्षांचा इतिहास अभिमानाने मिरवणारे चर्चगेट येथील इरॉस सिनेमागृह, 7 वर्षांनी नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला - चित्रपटगृहाचा इतिहास

Eros Cinema : इरॉस हे मुंबईतील चर्चगेट भागात असलेलं एक सुप्रसिद्ध सिनेमागृह. या सिनेमागृहाची डागडुजी सुरु होती. त्यामुळं तब्बल सात वर्षे हे सिनेमागृह बंद होतं. चर्चगेट स्टेशनच्या समोर दिमाखात उभं असलेलं इरॉस थिएटर आता सात वर्षांनी पुन्हा उघडलं आहे.

Eros theatre boasting a history of 90 years returns to the audience in a new transforms after 7 years
90 वर्षांचा इतिहास अभिमानाने मिरवणारे चर्चगेट येथील इरॉस सिनेमागृह, 7 वर्षांनी नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 10:25 PM IST

मुंबई Eros Cinema : स्वप्नांचं शहर अशी मुंबईची ओळख आहे. इथं अनेक तरुण स्वप्न घेऊन येतात आणि त्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतात. काही जण आपल्याला चांगली नोकरी लागेल, आपण सेटल होऊ अशा विचारात असतात. तर, काहीजण आपण मुंबईत येऊन बिझनेस सुरू करू आणि एक मोठा बिझनेस उभा करू अशी स्वप्नं बघतात. मात्र, या सगळ्या स्वप्न बघणाऱ्यांमधीलच आणखी एक मोठा वर्ग आहे. तो म्हणजे मुंबईत येऊन चित्रपटात काम करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांचा. अनेक तरुण मुंबईत येऊन आपल्याला चित्रपटात काम मिळेल, आपण देखील मोठे कलाकार होऊ असे स्वप्न बाळगतात. आज अनेक सेलिब्रिटी असे आहेत ज्यांनी अशी स्वप्नं पाहिली. या तरुणांच्या स्वप्नांचा इतिहास मुंबईतल्या एका सिनेमागृहानं खूप जवळून पाहिलाय. ते म्हणजे मुंबईतल्या चर्चगेट येथील 'इरॉस' चित्रपटगृह.

मुंबई सोबतच भारतीय चित्रपटसृष्टीचा 90 वर्षांचा इतिहास आपल्या उराशी बाळगणारे चर्चगेट येथील इरॉस सिनेमागृह आता तब्बल सात वर्षांनी पुन्हा एकदा चित्रपट प्रेमींच्या सेवेत दाखल झाले आहे. या चित्रपटगृहाचा इतिहास देखील तितकाच रंजक आहे. 2017 साली प्रदर्शित झालेला 'बाहुबली 2' हा इथे दाखवण्यात आलेला शेवटचा सिनेमा ठरला. त्यानंतर सिनेमाची वास्तू जुनी झाल्यानं आणि त्याच्या नूतनीकरणसाठी ते बंद करण्यात आलं. आता या चित्रपटात गृहाचं काम पूर्ण झालं असून, आजपासून ते आता पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालं आहे.

चित्रपटगृहाचा इतिहास : या चित्रपटगृहाचा इतिहास असा की सन 1935 मध्ये पारशी व्यापारी शियावक्स कावसजी कंबाटा यांनी एक चित्रपट गृह निर्माण करण्याचं ठरवलं. आता हे काम कुणाला द्यायचं? हा विचार करत असतानाच त्यांच्या डोक्यात त्याकाळचे प्रसिद्ध वास्तुविशारत सोहराबजी भेदवार यांचं नाव डोळ्यासमोर आलं. लागोलाग त्यांनी आपल्या डोक्यातील कल्पना भेदवार यांना सांगितल्या आणि वास्तुविषारद भेदवार यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. हे चित्रपटगृह ग्रीक शैलीवर आधारित आहे. इरॉस हे एका ग्रीक देवतेचे नाव असून, या ईश्वराच्या नावाच्या धरतीवर ही वास्तू बनवण्यात आली आहे. शियावक्स कावसजी कंबाटा यांनी 1935 मध्ये पाहिलेले स्वप्न 1938 साली पूर्ण झालं आणि अखेर 10 फेब्रुवारी 1938 रोजी हे चित्रपटगृह प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले.

चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या अगदी पलिकडे व्ही-आकाराच्या कंबाटा इमारतीत असलेले इरॉस सिनेमा एप्रिल 2017 मध्ये डागडुजीच्या कारणास्तव बंद करण्यात आले. या वास्तूच्या भिंती मजबूत आणि सुस्थितीत होत्या. मात्र, छताचं नुकसान झालं होते. फ्लोरिंग देखील खराब झालं होतं. इमारत जुनी असल्याने त्याची दुरुस्ती करणे आवश्यक होतं. अखेर 2019 ला दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अखेर 2024 मध्ये दुरुस्तीचं काम पूर्ण होऊन 9 फेब्रुवारी 2024 रोजी हे चित्रपटगृह पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुलं करण्यात आलं आहे.

चित्रपटगृहाच्या भिंतीवर भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास : पीव्हीआर सिनेमाचे मॅनेजिंग डायरेक्टर अजय बिजली यांनी सांगितले की, आम्ही या वास्तूचं पुरातन वैभव राखण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रीक शैलीच्या वास्तूत अनेक ग्रीक कलाकुसरी करण्यात आल्या होत्या. त्या आम्ही दुरुस्त करून पुन्हा एकदा मूळ रूपात आणले आहेत. या चित्रपटगृहाचे जे जुने फ्लोरिंग होते त्याच प्रकारचे आणि त्याच रंगाचे नवे फ्लोरिंग बसवण्यात आले आहे. इटालियन संगमरवरी रंगसंगतीचे हे फ्लोरिंग आहे. या चित्रपटगृहाच्या भिंतीवर आम्ही भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास देखील दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मल्टिप्लेक्सच्या जमान्यात सिंगल स्क्रीन चित्रपटगृह पुन्हा एकदा मुंबईकरांच्या मनोरंजनासाठी आम्ही दाखल केला आहे.

प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद : आता तब्बल सात वर्षांनी हे चित्रपटगृह पुन्हा एकदा मुंबईच्या मुंबईकरांच्या मनोरंजनासाठी दाखल झाल्याने, या चित्रपटगृहात आज शाहिद कपूर आणि कृती सेनन यांचा 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले. दहा वाजता या चित्रपटाचा पहिला शो दाखवण्यात आला. याला मुंबईकरांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला. यातीलच एक 73 वर्षीय प्रेक्षक डॅरेल यांच्याशी आम्ही बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की, लहानपणी वडिलांसोबत मी इथे यायचो. माझे बाबा मला इथं चित्रपट दाखवायला घेऊन यायचे. आज माझा नातू सतरा वर्षांचा आहे. त्यामुळे त्या सर्व जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.

हेही वाचा -

  1. चित्रपट दिग्दर्शक करण जोहरनं 'लव स्टोरिया' वेब सीरीजचा ट्रेलर केला रिलीज
  2. अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी स्टारर 'ब्लॅक' चित्रपट 19 वर्षानंतर ओटीटीवर प्रदर्शित
  3. व्हॅलेंटाईन वीक आणखी रोमँटिक बनवा, ओटीटीवर पाहा हे चित्रपट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.