ETV Bharat / entertainment

हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिज्मबद्दल कंगना रनौतच्या दाव्यावर इमरान हाश्मीनं केला खुलासा - Emraan hashmi and kangana ranaut

Emraan Hashmi And Kangana Ranaut : अभिनेता इमरान हाश्मीनं हिंदी चित्रपटसृष्टीत होत असलेल्या नेपोटिज्मबद्दलच्या कंगना रनौतच्या दाव्यावर खुलासा केला आहे. त्यानं एका मुलाखतीत या विषयावर आपले स्पष्ट मत मांडले आहे.

Emraan Hashmi And Kangana Ranaut
इमरान हाश्मी आणि कंगना रनौत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 12:57 PM IST

मुंबई - Emraan Hashmi And Kangana Ranaut: आपल्या ' ग्रे शेड लव्हर'च्या इमेजमुळे लोकप्रिय झालेल्या अभिनेता इमरान हाश्मीनं 'टायगर 3' मधून आपली पडद्यावरची इमेज बदलली. सलमान खानसमोर इमरानने साकारलेल्या क्रूर खलनायकाला प्रेक्षकांची दाद मिळाली. सध्या इमरान हाश्मी त्याच्या चित्रपट आणि वेब सीरीजमुळे चर्चेत आहे. तो लवकरच 'शोटाइम' या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. याशिवाय तो सारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसेल. आता इमरान वेब सीरीज आणि चित्रपटांच्या रिलीजपूर्वी एक वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

इमरान हाश्मीनं केला खुलासा : कंगना राणौतच्या नेपोटिज्म दाव्यावर इमरान हाश्मी उघडपणे बोलला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इमराननं 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' कंगना राणौतचं काम आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप कौतुक केलं आहे. 'गँगस्टर' चित्रपटादरम्यान त्यानं कंगना राणौतबरोबरच्या कामाच्या अनुभवाबद्दलदेखील सांगितलं आहे. इमरान हाश्मीनं या मुलाखतीत सांगितलं की, ''मला वैयक्तिकरित्या कंगना एक कलाकार आणि एक व्यक्ती म्हणून खूप आवडते. होय, तिला चित्रपटसृष्टीत काही वाईट अनुभव आले असतील. कंगना खूप चांगली व्यक्ती आहे. कंगना आपले काम अतिशय चांगले आणि जबाबदारीने करते. कंगनाबरोबरचा माझा अनुभव असा होता की, मी तिच्याबरोबर एक हिट चित्रपट दिला आहे. मी 'गँगस्टर'मध्ये खलनायकाची भूमिका केली होती, जिथे ती मुख्य भूमिकेत होती. इंडस्ट्रीमध्ये कधी नेपोटिज्मची सुरुवात झाली आणि लोकही नेपोटिज्मबद्दल बोलू लागतात हे योग्य नाही. नेपोटिज्म इंडस्ट्रीत होत असणार याबद्दल मला खरे वाटत नाही. इंडस्ट्रीत काही मोजकेच लोक असतील जे ड्रग्ज घेत असतील. संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी ड्रग्गी म्हणणे चुकीचे आहे.''

'कॉफी विथ करण' चॅट शो : कंगनानं 2017 मध्ये 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये करण जोहरवर नेपोटिज्म करत असल्याची टीका केली होती. तेव्हापासून नेपोटिज्मबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होत आहे. विशेषत: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकांनी याबाबत चर्चाही सोशल मीडियावर केली. दरम्यान कंगना आणि इमरान यांनी पहिल्यांदा 'गँगस्टर'मध्ये एकत्र काम केलं होतं आणि त्यानंतर 'राझ: द मिस्ट्री कंटिन्यूज', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' आणि 'उंगली' यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम त्यांनी केलं आहे.

हेही वाचा :

  1. नयनतारानं इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर विघ्नेश शिवननं शेअर केली पहिली पोस्ट
  2. आमिर खान आणि 'तारे जमीन पर'चा दर्शील सफारी 16 वर्षांनंतर सिनेमासाठी एकत्र
  3. रणदीप हुड्डा स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.