ETV Bharat / entertainment

मराठी चित्रपटासाठी ठाण्यात फिल्मसिटी सुरू करणार-एकनाथ शिंदे - chief minister eknath shinde - CHIEF MINISTER EKNATH SHINDE

Dharmaveer 2 : शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांच्यावर आधारित 'धर्मवीर'चा आता दुसरा भाग येणार आहे. या चित्रपटाचं आता पोस्टर लॉन्च करण्यात आलंय.

Dharmaveer 2
धर्मवीर 2 (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 1:00 PM IST

मुंबई - Dharmaveer 2 : शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासावर 'धर्मवीर' चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी या चित्रपटला खूप पसंत केलं होतं. आता लवकरच धर्मवीर 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते 'धर्मवीर 2' चित्रपटाचे पोस्टर लॉन्च सोहळा वर्षा निवास्थानी पार पडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेता, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगावकर, बॉबी दिओल, प्रसाद ओक यांच्यासह चित्रपटसृष्टीमधील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देत म्हटलं, "आनंद मरते नहीं, आनंद मरा नहीं करते." यानंतर त्यांनी 'धर्मवीर 2' चित्रपटदेखील सुपरहिट ठरेलं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

'या' स्टार्सनं दिल्या 'धर्मवीर 2' चित्रपटासाठी शुभेच्छा : 'धर्मवीर' चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीनंतर सर्वांनाच 'धर्मवीर 2' चित्रपटाचे वेध लागले आहे. लवकरच हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटसृष्टीमधील अनेक मान्यवरांनी चित्रपट यशस्वी व्हावा अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आपले विचार व्यक्त : 'धर्मवीर 2' पोस्टर लॉन्चिंग कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, "धर्मवीर' आनंद दिघे हे माझे गुरू होते. त्यांच्या सावलीत मी वाटचाल सुरू केली. राजकारण आणि समाजकारण त्याच्याकडून शिकलो. जनतेच्या हृदयात त्यांनी स्थान निर्माण केलं होतं. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा आम्ही शब्द पूर्ण करत होतो. दिघे साहेबांचा आम्ही संघर्ष पाहिला आहे. त्यांचे बँकेत खाते सुद्धा नव्हतं. तरीही व्यक्तिमत्व राज्यात कानाकोपऱ्यात लोकप्रिय झालं होतं. कुठलीही सत्ता नसताना जनतेच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं. प्रत्येक पावलोपावली दिघे साहेब यांची आठवण येते. आज त्यांचे शब्द कानावर पडल्यासारखं वाटत. मी मुख्यमंत्री नाही तर जनतेचा सेवक स्वत:ला समजतो."

एकनाथ शिंदे यांनी साधला आदित्य ठाकरेवर निशाना : पुढं त्यांनी म्हटलं, "लोकांच्या मागणीनुसार 'धर्मवीर पार्ट 2' आला आहे. प्रसाद ओक यांना मी धन्यवाद देतो. ओक यांनी आनंद दिघे साहेब यांना पाहिलं नव्हतं. त्याची माहिती घेऊन त्यांनी भूमिका साकारली. सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. मात्र सगळं खरे दाखवू शकत नाही. आम्ही मराठी चित्रपटासाठी फिल्म सिटी तयार करत आहोत. ठाण्यात चित्रपट नगरी उभी करायची आहे.आमचे सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित स्थापन झालंय . आम्ही सत्तेसाठी तडजोड करत नाहीत."

हेही वाचा :

  1. गायक अभिजीत भट्टाचार्यनं सलमान खानच्या हिट गाण्याबाबत केला धक्कादायक खुलासा - SINGER ABHIJEET BHATTACHARYA
  2. डेब्यू प्रोडक्शन 'क्रॅक'सह करोडो गमावल्यानंतर विद्युत जामवाल फ्रेंच सर्कसमध्ये झाला सामील - VIDYUT JAMMWAL
  3. 'बालिका वधू' फेम अविका गोरनं 'या' चित्रपटातून केलं होत तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण - avika celebrating her birthday

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.