ETV Bharat / entertainment

'किंग खान' स्टारर 'डंकी' चित्रपट ओटीटीवर रिलीज

Dunki OTT release: शाहरुख खानचा 'डंकी' नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. 'किंग खान'नं 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या दिवशी त्याच्या चाहत्यांना शानदार गिफ्ट दिलंय.

Dunki OTT release
डंकी ओटीटी रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 12:12 PM IST

Updated : Feb 15, 2024, 2:48 PM IST

मुंबई - Dunki OTT release: अभिनेता बादशाह शाहरुख खानच्या 'डंकी'नं बॉक्स ऑफिसवर प्रचंड खळबळ उडवून दिली होती. डिसेंबर 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर चाहते या चित्रपटाच्या ओटीटी स्ट्रीमिंगची आतुरतेनं वाट पाहत होते. 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या निमित्तानं शाहरुखनं चाहत्यांसाठी सरप्राईज व्हिडिओ नेटफ्लिक्सवर जारी केला होता. या व्हिडिओत त्यानं त्याच्या चाहत्यांना आज काहीतरी विशेष होणार असल्याचं सांगितलं होत. अखेर 'किंग खान'नं चाहत्यांना खूश केलं आहे. 'डंकी' नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.

शाहरुख खानचा 'डंकी' : नेटफ्लिक्सनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करून 'डंकी' रिलीज झाल्याची घोषणा केली आहे. आता तुम्ही घरी बसून नेटफ्लिक्सवर आरामात या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. शाहरुख खान स्टारर 'डंकी'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 29.2 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं होतं. याशिवाय देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 'डंकी'नं एकूण 212.42 कोटींची कमाई केली. जगभरात या चित्रपटानं कलेक्शन 439.5 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. शाहरुखचा हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'डंकी' चित्रपटाची कहाणी : 'डंकी'मध्ये शाहरुखनं हार्डी नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. शाहरुख खानव्यतिरिक्त या चित्रपटामध्ये तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी यांच्यासह अनेक कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. चित्रपटाची कहाणी 4 मित्रांवर आधारित आहे, जे आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अवैधरित्या दुसऱ्या देशात जाण्याचा प्रयत्न करतात. पण हा प्रवास अपेक्षेपेक्षा जास्त धोकादायक ठरतो. राजकुमार हिरानीचा हा चित्रपट 120 कोटींच्या बजेटमध्ये बनवला आहे. या चित्रपटातला 'किंग खान' आणि तापसीचा अभिनय प्रेक्षकांना भावला. 'डंकी' चित्रपटाचा रनटाईम 2.40 मिनिटांचा आहे. दरम्यान किंग खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'टायगर वर्सेस पठान' चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. अबुधाबीतील मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात लावली अक्षय कुमार आणि शंकर महादेवननं हजेरी
  2. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा 'शिवरायांचा छावा' १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात
  3. पत्नी शहराबाहेर गेल्यानं शाहिद कपूरनं उघड केला त्याच्या 'नाईट डेट'चा प्लॅन

Last Updated : Feb 15, 2024, 2:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.