ETV Bharat / entertainment

'दो पत्ती'चा ट्रेलर रिलीज, दोन बहिणींच्या 'महाभारत'मध्ये अडकली काजोल

Do Patti Trailer : काजोल आणि क्रिती सेनॉन स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'दो पत्ती'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर खूप धमाकेदार आहे.

author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 3 hours ago

Do Patti Trailer
दो पत्तीचा ट्रेलर (दो पत्ती ट्रेलर रिलीज (Netflix Youtube))

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि क्रिती सेनॉन स्टारर 'दो पत्ती' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट शशांक चतुर्वेदी यांनी दिग्दर्शित केला आहे. 'दो पत्ती'चा ट्रेलर अप्रतिम असून यात काजोल एका हत्येचं गूढ उकलताना दिसत आहे. दुसरीकडे क्रिती या चित्रपटात दुहेरी भूमिकेत असल्याची दिसत आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यात शाहीर शेखचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. कनिका ढिल्लन यांनी लिहिलेल्या या चित्रपटात काजोल एका पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारत आहे. काजोल पहिल्यांदाच पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.

'दो पत्ती'चा ट्रेलर रिलीज : 'दो पत्ती' चित्रपटाची निर्मिती कनिका ढिल्लनच्या कथा पिक्चर्स आणि क्रिती सेनॉनच्या ब्लू बटरफ्लाय फिल्म्सनं केली आहे. ट्रेलरमध्ये देवीपूर या काल्पनिक डोंगरी गावात पोलीस निरीक्षक विद्या ज्योती ही (काजोल) सौम्या (क्रिती सेनॉन) आणि तिचा पती ध्रुव सूद (शाहीर शेख) यांच्यातील त्रासदायक घटना सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसते. यानंतर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्विस्ट्स येतात. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना थ्रिल पाहायला मिळणार आहे. क्रिती सेनॉनची ही पहिली चित्रपट निर्मिती असणार आहे, त्यामुळे ती तिच्या या पहिल्या चित्रपटाबद्दल खूप उत्सहित आहे.

9 वर्षांनंतर काजोल आणि क्रिती एकत्र : काजोल आणि क्रिती यांनी 2015च्या 'दिलवाले' या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं होतं. आता यानंतर नऊ वर्षांनी या दोघीही हाय-स्टेक ड्रामामध्ये पुन्हा एकत्र येत आहेत. ट्रेलरमध्ये क्रितीच्या दुहेरी भूमिकेनं सर्वांची मनं जिंकली आहेत. कारण तिनं दोन भिन्न व्यक्तिमत्त्वांसह पात्रे साकारली आहेत. चित्रपटाची लेखिका आणि निर्माती कनिका ढिल्लननं या चित्रपटाबद्दल म्हटलं, 'दो पत्ती माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. क्रिती आणि काजोल या दोन पॉवरहाऊस कलाकारांबरोबर काम करणं, हा एक चांगला अनुभव होता.' आता क्रिती आणि काजोलचे चाहते त्यांच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.