मुंबई - Divyanka and Vivek: अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया सध्या चर्चेत आहेत. दोघेही नुकतेच सुट्टीवर इटलीला गेले होते. या जोडप्याबरोबर एक घटना घडल्यानं त्यांना इटलीमध्ये त्रास झाला. या दोघांबरोबर चोरीची घटना घडली होती आणि यामध्ये दोघांचे पासपोर्ट हरवले आहेत. तेव्हापासून दोघेही इटलीत अडकले होते, मात्र आता दोघेही मंगळवारी सकाळी भारतात परतले आहेत. घरी परतल्यानंतर दोघांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. गेल्या बुधवारी इटलीच्या फ्लॉरेन्स शहरात त्यांच्या कारमधून त्यांचा पासपोर्ट आणि काही पैसे चोरीला गेले होते. यानंतर या जोडप्यानं भारतीय दूतावास आणि इटालियन प्रशासनाकडे मदत मागितली होती.
दिव्यांका मायदेशी परतली : आता ते भारतात परत येऊ शकले आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया विमानतळावर स्पॉट झाले. दोघेही भारतात आल्यानंतर मीडियाशी बोलताना दिसले. यादरम्यान दिव्यान म्हटलं की, "घरी पोहोचल्यावरच खरी शांती मिळते." यावर एका व्यक्तीनं तिला विचारलं की, "दिव्यांका, तुझा पासपोर्ट कसा चोरीला गेला? यावर ती म्हणते की, "ही एक लांबलचक गोष्ट आहे आणि ती यावर चर्चा करणार आहे. या व्हिडिओमध्ये दिव्यांका हसत दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दिव्यांका त्रिपाठीचे चाहते खूप खूश झाले आहेत.
दिव्यांकानं आपत्कालीन प्रमाणपत्र मिळाल्याची दिली होती माहिती : दिव्यांकानं इंस्टाग्रामवर पोस्ट करून भारतीय दूतावासाचे आभार मानले होते आणि सांगितलं होतं की, "तिला आपत्कालीन प्रमाणपत्र मिळाले आहे. आता ती सहज मायदेशी परतू शकते." दरम्यान पासपोर्ट हरवला, चोरीला गेला किंवा खराब झाला असेल, अशा भारतीय नागरिकांना आपत्कालीन प्रमाणपत्र दिले जाते. दिव्यांका त्रिपाठीच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर, ती 'ये है मोहब्बतें' आणि 'बनू में तेरी दुल्हन' सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. विवेकनं 2013 मध्ये 'ये है आशिकी'मधून टेलिव्हिजन डेब्यू केला होता. त्यानं 2016 मध्ये दिव्यांकाबरोबर लग्न केलं. 'ये है मोहब्बतें' या शोमध्ये दोघेही एकत्र दिसले होते. या शोच्या सेटवर दोघे प्रेमात पडले होते.
हेही वाचा :