मुंबई - Sandeep Vanga Reddy : 'अॅनिमल' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या उत्तुंग यशानंतर संदीप रेड्डी वंगा आता बाहुबली स्टार प्रभासला बरोबर पॅन इंडिया अॅक्शन चित्रपट 'स्पिरीट'च्या तयारीवर लक्ष केंद्रीत करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, संदीपने आत्मविश्वासाने भाकीत केलं की हा चित्रपट पहिल्याच दिवशी भारतात 150 कोटींहून अधिक कमाई करू शकेल. प्रभाससारख्या स्टारसाठी चित्रपटाचे ३०० कोटी रुपयांचे बजेट अगदी रास्त असल्याचं त्यानं स्पष्ट केलं.
मुलाखतीदरम्यान संदीपने 'स्पिरीट' चित्रपटाची निर्मिती करताना मोठ्या बजेटमुळे तयार झालेला दबाव आणि आर्थिक चिंता तो कशी हाताळणार आहे, याचा खुलासा केला. सुपरस्टार प्रभासची स्टार पॉवर आणि त्याचे एकत्रित प्रयत्न, सॅटेलाइट आणि डिजिटल अधिकारांसह हा चित्रपटाचा खर्च सहज वसुल होईल याचा विश्वास त्यानं व्यक्त केला.
"मला असं वाटतं कारण ते ज्या प्रकारचे बजेट ठेवत आहेत, त्यामुळे निर्माते सुरक्षित आहेत असे मला ठामपणे वाटतं. प्रभास आणि माझ्या जोडीच्या प्रयत्नातून सॅटेलाइट आणि डिजिटल अधिकारांसह, आम्ही आमचे बजेट तिथेच वसूल करू शकतो. जर सर्व काही टीझर, ट्रेलर आणि गाण्यांसह ठीक झाले तर प्री-रिलीज आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही जे काही करणार आहोत, त्यामुळे ओपनिंग डे ची कमाई 150 कोटी होऊ शकेल. हे एक ट्रेड कॅलक्युलेशन आहे. ते जगभरात किंवा संपूर्ण भारतातील कॅलक्यलेशन आहे. अशा चित्रपटाचा आशय विषय आणि निर्मिती मुल्य मनोरंजक असतील तर चित्रपटाची एका दिवसात 150 कोटी रुपयाची कमाई सहज होऊ शकते," असं चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक संदीप वंग्गा रेड्डी यानं सांगितलं.
संदीपनं असेही उघड केलं की, 'अॅनिमल'च्या आधी त्यानं प्रभास बरोबर हॉलिवूड रिमेकचे दिग्दर्शन करण्याची संधी नाकारली होती. त्याऐवजी, त्यानं प्रभासशी 'स्पिरिट'च्या संकल्पनेसह संपर्क साधला. या चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबर ते डिसेंबर 2024 दरम्यान सुरू होणार आहे.
2017 मध्ये 'अर्जुन रेड्डी' बरोबर दिग्दर्शनात पदार्पण केल्यानंतर, संदीपने 2019 मध्ये 'कबीर सिंग' चित्रपटाचं दिग्दर्शन करुन मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळवली. तो आता रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि इतर कलाकार असलेल्या 'अॅनिमल'च्या सिक्वेलवर काम करत आहे.
हेही वाचा -