मुंबई - Ranbir Kapoor and Virat Kohli biopic : क्रीडा विश्वातून कपिल देव, एम.एस. धोनी, सचिन तेंडुलकर, मेरी कोम, मिल्खा सिंग, पान सिंग तोमर आणि 'चंदू चॅम्पियन' मुरलीकांत पेटकर यांच्या बायोपिक बनवण्यात आला असून आता आणखी एक क्रिकेट स्टार विराट कोहलीच्या बायोपिकची चर्चा होत आहे. विराट कोहलीचा बायोपिक बनवला तर पडद्यावर विराटची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न नक्कीच सगळ्यांच्या मनात येईल. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. यावर टीम इंडियाचा माजी खेळाडू दिनेश कार्तिकनं उत्तर दिलं आहे. विराट कोहलीच्या बायोपिकची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे.
विराट कोहलीचा बायोपिकमध्ये कोण दिसेल : दरम्यान, दिनेश कार्तिकनं काही अभिनेत्यांची नावं सुचवली आहेत, त्यात बॉलिवूड स्टार रणबीर कपूरचाही समावेश आहे. विराट कोहलीच्या बायोपिकसाठी कोण योग्य असेल याचा खुलासा नुकताच दिनेशनं केला. त्यानं सांगितलं की, विराट कोहलीच्या बायोपिकसाठी रणबीर कपूर आणि क्रिकेटर शिखर धवनच्या बायोपिकसाठी अक्षय कुमारचं नाव त्यानं घेतलं आहे. सूर्य कुमार यादवसाठी दिनेशनं सुनील शेट्टीचं सुचवलं आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या बायोपिकसाठी रणबीर कपूर ठिक असल्याचं त्यानं सांगितलं आहे.
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचा बायोपिक कोण करू शकतो : यानंतर दिनेश इथेच थांबला नाही त्यानं रणवीर सिंग हा हार्दिक पांड्याच्या बायोपिकसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचं त्यानं म्हटलं. यानंतर त्यानं युझवेंद्र चहलसाठी राजपाल यादव, जसप्रीत बुमराहसाठी राजकुमार आणि रोहित शर्माच्या बायोपिकसाठी त्याच्या आवडत्या अभिनेत्याचं नाव विजय सेतुपतीचं घेतलं. बाकी काही खेळाडूच्या बायोपिकवर चित्रपट बनेल याबद्दल माहीत नाही. मात्र विराट कोहलीच्या बायोपिकवर नक्कीच बायोपिक बनेल असं सध्या दिसत आहे, कारण याबद्दल चर्चा होतं आहेत. विराट कोहली बायोपिकबद्दल काही दिवसात अपडेट येण्याची शक्यता आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा कुठला अभिनेता दिसेल हे येणाऱ्या काही दिवसात समजेल. आता या बातमीमुळे विराट कोहलचे चाहते खुश आहोत.
हेही वाचा :