मुंबई - Diljit Dosanjh : पंजाबी स्टार दिलजीत दोसांझ आता ग्लोबल सिंगर झाला आहे. दिलजीतच्या गाण्यांचा आवाज देश-विदेशात गुंजत आहे. दिलजीत हा अनेकदा विदेश दौऱ्यावर असतो. तो चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करतो. दरम्यान दिलजीतवर दिल-लुमिनाटी कॉन्सर्टमध्ये डान्सर्स आणि कोरिओग्राफरला पैसे न दिल्याचा आरोप केला गेले आहेत. कोरिओग्राफरनं पैसे न दिल्याचा आरोप करत सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. आता दिलजीत दोसांझच्या मॅनेजरनं हे आरोप निराधार ठरवत या प्रकरणाचे संपूर्ण सत्य सर्वांसमोर आणलं आहे.
दिलजीत दोसांझवर केला गेला आरोप : दिलजीत दोसांझची मॅनेजर सोनाली सिंगनं इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भात एक पोस्ट जारी केली. या पोस्टवर तिनं लिहिलं, "रजत भट्ट आणि मनप्रित तूर यांचा दिलजीतच्या गाण्याच्या कॉन्सर्टशी काहीही संबंध नाही. याबद्दल आता कोरियोग्राफर खोट्या बातम्या पसरवत आहेत. दिलजीतच्या मॅनेजरनं पुढं लिहिलं, "दिल-लुमिनाटी कॉन्सर्टचे अधिकृत कोरिओग्राफर बलविंदर सिंग, प्रीत चहल, दिव्या आणि पार्थ होते, त्यामुळे या कॉन्सर्टशी कोणाचाही संबंध नाही. अशा अफवांपासून दूर राहा." दिल-लुमानिटी कॉन्सर्टचे कोरिओग्राफर प्रीत चहल यांनी सांगितले की, "डांसर्स दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळाल्यानं खुश होत्या, मात्र या डांसर्सला परफॉर्मन्ससाठी पैसे दिले होते याची पुष्टी झाली नाही"
दिलजीत दोसांझचं वर्कफ्रंट : दिलजीत दोसांझचा दिल-लुमिनाटी कॉन्सर्ट 27 एप्रिल रोजी सुरू झाला आणि 13 जुलै रोजी संपला. आता त्याचा काही दिवसापूर्वीचं कॅनडा कॉन्सर्ट झाला होता यावेळी त्यानं दिलजीत दोसांझची पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी अचानक भेट घेतली. यानंतर सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले होते, यात दिलजीत जस्टिन ट्रूडो यांना शेकहॅन्ड करताना दिसला होता. याशिवाय दिलजीत हा करिना कपूर, खान तब्बू आणि क्रिती सेनॉनबरोबर 'क्रू' या चित्रपटामध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटामधील काही गाणी देखील दिलजीतनं गायली आहेत.
हेही वाचा :