मुंबई- Bhairava Anthem Song Release : अभिनेता प्रभासच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'कल्की 2898 एडी'मधील 'भैरव थीम'वरचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याचा प्रोमो 14 जून रोजी रिलीज करण्यात आला होता. तेव्हापासून चाहते या गाण्यांची आतुरतेनं वाट पाहात होते. आज 17 जून रोजी 'कल्की 2898 एडी'मधील गाणं रिलीज झाल्यानंतर अनेकजण या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचं दिसत आहे. भैरव थीम गाणं पंजाबी स्टार दिलजीत दोसांझनं आपल्या दमदार आवाजात गायलं आहे. या गाण्यात दिलजीत आणि साऊथ स्टार प्रभासची दमदार जोडी पाहायला मिळत आहे.
'कल्की 2898 एडी'मधील पहिलं गाणं रिलीज : 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांना हे गाणं 2024 मधील सर्वात जबरदस्त असल्याचं म्हटलं आहे. आता या गाण्याला चाहत्यांकडून किती प्रेम मिळते, हे येत्या 24 तासांत कळेल. 'कल्की 2898 एडी'या चित्रपटाच्या रिलीजची वाट अनेकजण पाहात आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन नाग अश्विननं केलं आहे. त्यांनी 'कल्की 2898 एडी' चित्रपटावर खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटामध्ये प्रभासबरोबर दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि दिशा पटानी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटात साऊथ सुपरस्टार कमल हासन खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर रिलीज झाला होता.
आर्ट वर्क चोरल्याचा आरोप : या ट्रेलरमध्ये सर्व स्टार कास्टचं फर्स्ट लूक समोर आलं होतं. 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट आता एका वादात अडकला आहे. 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांवर हॉलिवूड चित्रपटाचं आर्ट वर्क चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकवेळा पुढे ढकलल्यानंतर, आता 'कल्की 2898 एडी अखेर 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान प्रभासच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'राजा साब', 'कन्नप्पा' आणि 'स्पिरिट' चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे आणखी काही प्रोजेक्ट्स आहेत.
हेही वाचा :