ETV Bharat / entertainment

'धर्मरावबाबा आत्राम' माहितीपटाचा ट्रेलर लॉन्च - धर्मरावबाबा आत्राम

Dharmarao Baba Atram documentary :'धर्मरावबाबा आत्राम' हा माहितीपट प्रेक्षकांसाठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आदिवासींसाठी कार्यरत असलेल्या आत्राम यांच्या संघर्षमय जीवनाचा परिचय यातून करुन देण्यात आलाय. याचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

Dharmarao Baba Atram documentary
'धर्मरावबाबा आत्राम' माहितीपटाचा ट्रेलर लॉन्च
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 5:05 PM IST

मुंबई - Dharmarao Baba Atram documentary : सध्या अनेक बायोपिक चित्रपट येत असताना एक जीवनपट माहितीपटाच्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धर्मरावबाबा आत्राम यांचा जीवनपट डॉक्युमेंटरी फॉरमॅट मध्ये लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, ज्याचे नाव आहे 'धर्मरावबाबा आत्राम'. नुकताच या माहितीपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग करण्यात आले.

Dharmarao Baba Atram documentary
'धर्मरावबाबा आत्राम' माहितीपटाचा ट्रेलर लॉन्च

"राजकारणात अनेक व्यक्ती आहेत ज्या मोठ्या पदांवर पोहोचल्या आहेत परंतु बऱ्याच जणांना त्यामागची मेहनत आणि कष्ट दिसत नाही. महाराष्ट्रातील गडचिरोली या नक्षलग्रस्त भागाबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. परंतु धर्मरावबाबा आत्राम यांनी तिथे भरपूर सामाजिक कार्य केले असून लाखो लोकांना मुख्य प्रवाहात आणले आहे. धर्मरावबाबा आत्राम हे गौंड या आदिवासी समाजाच्या राजघराण्यातील आहेत. त्यांनी नेहमीच लोककार्याला प्राथमिकता दिलेली आहे. मुंबईतील बऱ्याच लोकांना महाराष्ट्रातील अनेक गावे आणि निमशहरी भागांची नावे सुध्दा माहित नसतात. मी स्वतः गोंदियाचा आहे परंतु ते कुठे आहे हे आजही बऱ्याच जणांना माहीत नाहीये. जे राज्यातील अंतर्भागात कार्य करतात त्यांच्याबद्दल समाजाला कळणे गरजेचे आहे. 'धर्मरावबाबा आत्राम' हा माहितीपट महाराष्ट्रातील तळागाळात पोहोचणे गरजेचे आहे," असे प्रफुल पटेल यांनी च्रलर लॉन्च करताना सांगितले.

धर्मरावबाबा आत्राम यांना दिलोंका राजा म्हटले जाते. ते गडचिरोली मधील अहेरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत. अहेरीच्या राजघराण्यातील आत्राम यांनी सरकारांमध्ये महत्वाची पदे सांभाळली आहेत. त्यांना नक्षलवाद्यांनी अपहरण करून नेले होते आणि ते १७ दिवस त्यांच्या बंदिवासात होते. त्यांनी आपल्या आदिवासी बांधवांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या. धर्मरावबाबा आत्राम यांचा प्रेरणादायी प्रवास हिंदीमध्ये ४० मिनिटांच्या माहितीपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

'धर्मरावबाबा आत्राम' या माहितीपटाची निर्मिती नीतू जोशी यांनी केली असून त्याचे दिग्दर्शन केले आहे भूषण चौधरी यांनी. या माहितीपटाची कथा आणि संकल्पना या दोघांचीच आहे. महेश कांगणे यांनी गीतलेखनाबरोबरच संगीत नियोजनाची जबाबदारीही पार पाडली आहे. 'धर्मरावबाबा आत्राम' मध्ये धर्मरावबाबा आत्राम यांनीच भूमिका केली असून राजू अवले, सुमेधा रामे, चिरंजीव गड्डमवार, एकनाथ अल्ताफ, दीपक, सत्यनारायण मेरगा, संजय मामूनकर, राजेश पुरी यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

हेही वाचा -

  1. अजय देवगण स्टारर 'दृष्यम'चा हॉलिवूड रिमेक होणार या उल्लेखामुळे मोहनलालचे चाहते भडकले
  2. नेपोटिझम वादावर चर्चा करणाऱ्या कंगनाला सहा वर्षानंतर गडकरींकडून मिळालं 'समाधानकारक' उत्तर
  3. रजनीकांतला इकॉनॉमी क्लासमध्ये पाहून सहप्रवाशांना गगन ठेंगणे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.