ETV Bharat / entertainment

प्रसाद ओक स्टारर 'धर्मवीर - 2' चित्रपट 9 ऑगस्ट ऐवजी होईल 'या' दिवशी रिलीज, जाणून घ्या तारीख - Dharamveer 2 marathi Movie - DHARAMVEER 2 MARATHI MOVIE

Dharamveer 2 Movie : 'धर्मवीर - 2' हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये 9 ऑगस्ट रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार होता. आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढं ढकलण्यात आली आहे.

Dharamveer 2 Movie
धर्मवीर - 2 चित्रपट (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 4:55 PM IST

मुंबई - Dharamveer 2 Movie : समाजकार्याला वाहून घेतलेले राजकीय नेते आनंद दिघे यांचा चरित्रपट धर्मवीर दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. चित्रपटाच्या घोषणेनंतरच 'धर्मवीर-2' चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच लॉन्च करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रसिद्ध बॉलिवूड स्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि हिंदी तसंच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रतिष्ठित कलाकार उपस्थित होते. यावेळी 'धर्मवीर-2' येत्या 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती लक्षात घेता, या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय निर्माते मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल यांनी घेतला आहे.

'धर्मवीर - 2' चित्रपट होणार सप्टेंबरमध्ये रिलीज : अतिवृष्टीमुळं अनेक गावं पाण्याखाली गेली आणि काही गावांचा संपर्क तुटला आहे. प्रदर्शनाची तारीख जवळ येऊ लागली होती, अनेक ग्रुप बुकिंग्स खोळंबले होते. परदेशातूनही चित्रपटाच्या प्रदर्शनाची चौकशी होत होती तसंच सोशल मीडियावर देखील चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत विचारणा होत होती. आता महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती आटोक्यात आली असून 'धर्मवीर - 2' चित्रपट 27 सप्टेंबरला जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्याचे ठरले आहे.

'धर्मवीर - 2' चित्रपटाबद्दल : साहील मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी 'धर्मवीर - 2' या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा वाहिली असून पहिल्या भागाप्रमाणेच लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी सांभाळली आहे. मंगेश कांगणे, स्नेहल तरडे, डॉक्टर प्रसाद बिवरे, विश्वजीत जोशी यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांना अविनाश - विश्वजीत आणि चिनार-महेश यांचे संगीत लाभले आहे. या चित्रपटातील गाणी सुप्रसिद्ध गायक हरिहरन, जावेद अली, सुखविंदर सिंग, विशाल दादलानी, आदर्श शिंदे, मनीष राजगिरे तसेच बेला शेंडे यांच्या आवाजात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

हेही वाचा :

  1. 'धर्मवीर 2' चित्रपटमुळं बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.