मुंबई - RAYAN TRAILER : अभिनेता, दिग्दर्शक धनुषचा बहुप्रतीक्षित 'रायन' चित्रपट पुढील आठवड्यात रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. निर्मात्यांनी १६ जुलै रोजी संध्याकाळी 'रायन'चा ट्रेलर रिलीज केला आहे. अॅक्शन, सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला हा ट्रेलर पाहून धनुषचे चाहते आनंदित झाले आहेत. रायन हा चित्रपट कमल हसनचा 'इंडियन 2' रिलीज झाल्यानंतर दोन आठवड्यांनंतर 26 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. धनुष 'पा पांडी' या चित्रपटानंतर दिग्दर्शित केलेला दुसरा चित्रपट आहे. 'रायन'च्या ट्रेलरमध्ये धनुषची एन्ट्री पूर्णपणे नेत्रदीपक झाली आहे. ट्रेलरमध्ये तो खूप अॅक्शन करताना दिसत आहे.
धनुष दिग्दर्शित दुसरा चित्रपट रायन
धनुष मुख्य भूमिकेत असलेला रायन हा अंडरवर्ल्ड कथा असलेला चित्रपट आहे. आपल्या कुटुंबाच्या हत्येचा बदला घ्यायचा असलेल्या एका सामान्य मुलावर केद्रीत असलेली याची कथा आहे. याआधी धनुषनं 'पा पांडी' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. याशिवाय अभिनेता म्हणून हा त्याचा ५० वा चित्रपट आहे. 'पा पांडी' या त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता आणि हा चित्रपट व्यावसायिक दृष्ट्याही यशस्वी ठरला होता. त्याचा दुसरा चित्रपट कलानिधी मारन यांनी सन पिक्चर्स या बॅनर अंतर्गत तयार केला आहे.
चित्रपटाला मिळाले ए प्रमाणपत्र
धनुषचा हा चित्रपट दोन तास 25 मिनिटांचा असून त्याला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले आहे. धनुष व्यतिरिक्त एसजे सूर्या, संदीप किशन, कालिदास जयराम, अपर्णा बालमुरली, दुशरा विजयन, प्रकाश राज आणि सेल्वाराघवन हे कलाकार विशेष भूमिकेत आहेत. 'रायान'चे संगीत ए आर रहमानने दिले आहे.
हेही वाचा -
धनुष स्टारर 'रायन'चा ट्रेलरचे काउंटडाऊन सुरू, निर्मात्यांनी शेअर केली अपडेट - RAAYAN TRAILER
धनुषच्या D50 च्या फर्स्ट लूकचे काउंटडाऊन सुरू, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला