ETV Bharat / entertainment

'देवरा पार्ट 1' मेकर्सनं नवीन पोस्टर शेअर करून ज्युनियर एनटीआरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Jr NTR Birthday - JR NTR BIRTHDAY

Jr NTR Birthday: साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आज 20 मे रोजी 41वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी 'देवरा पार्ट-1'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Jr NTR Birthday
ज्युनियर एनटीआरचा वाढदिवस (देवरा पार्ट-1'चं पोस्टर (@devaramovie instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 10:23 AM IST

मुंबई - Jr NTR birthday : अभिनेता ज्युनियर एनटीआर आज, 20 मे रोजी आपला 41वा वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान 'देवरा पार्ट-1'च्या निर्मात्यांनी वाढदिवसाच्या संध्याकाळी म्हणजेच 19 मे रोजी चित्रपटाचं 'फियर सॉन्ग' रिलीज करून त्याला आणि त्यांच्या चाहत्यांना भेट दिली होती. दरम्यान 'देवरा पार्ट-1'च्या निर्मात्यांनी या चित्रपटातील नवीन पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरद्वारे त्यांनी ज्युनियर एनटीआरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी रेड हार्ट आणि स्मायली इमोजीसह कॅप्शनमध्ये लिहिलं, "आमच्या देवरा जूनियर एनटीआरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

ज्युनियर एनटीआरचं पोस्टर रिलीज : रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये देवरा खडकावर बसून हसताना दिसत आहे. याशिवाय त्याच्या आजूबाजूला काही लोक दिसत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन कोरटाला शिवा यांनी केलंय. या चित्रपटामध्ये ज्युनियर एनटीआरची प्रेक्षकांना अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. 'देवरा पार्ट-1' चित्रपटाची निर्मिती युवासुधा आर्ट्स आणि एनटीआर आर्ट्स यांनी केली आहे. 'देवरा पार्ट-1' चित्रपटात ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त जान्हवी कपूर आणि सैफ अली खान देखील आहेत. कोरटाला शिवा दिग्दर्शित 'देवरा पार्ट-1' दोन भागात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दसऱ्याच्या वीकेंडला म्हणजेच 10 ऑक्टोबर 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'देवरा'मधील 'फियर सॉन्ग' प्रदर्शित : दरम्यान काल 19 मे रोजी 'देवरा पार्ट-1'मधील गाणं रिलीज करण्यात आलं होत. या गाण्यात ज्युनियर एनटीआरचा डॅशिंग स्वॅग पाहायला मिळत आहे. 'फियर सॉन्ग' गाण्यात एनटीआर समुद्र किनारी खडकावर बसलेला दिसत आहे. ज्युनियर एनटीआरचं 'फियर सॉन्ग' अनेकांना आवडत आहे. या गाण्याला अल्पावधीतच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. आता अनेकजण या गाण्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देऊन हा चित्रपट ब्लॉकबस्टर होणार असल्याचं म्हणत आहेत. 'देवरा' हा जान्हवीचा पहिला तेलुगू चित्रपट आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान ज्युनियर एनटीआरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'वॉर 2'मध्ये हृतिक रोशनबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. जान्हवी, फरहान, राजकुमार रावसह बॉलिवूड सेलेब्रिटींनी मुंबईत केलं मतदान - Lok Sabha Election 2024
  2. वयाच्या 13 व्या वर्षी फोटो ॲडल्ट साइटवर झाले होते लीक...; जान्हवी कपूरनं केला धक्कादायक खुलासा - JANHVI KAPOOR SEXUALISED AT 13'रामायण'मधील रावणासाठी तयार होणार खऱ्या सोन्याचा पोशाख - nitesh tiwari upcoming film

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.