ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोणला गरोदरपणामध्ये 'हा छंद जीवाला लावी पिसे' !! - deepika padukone - DEEPIKA PADUKONE

Deepika Padukone : दीपिका पदुकोण तिच्या प्रेग्नेंसीमुळे सध्या चर्चेत आहे. ती सध्या गरोदरपणामध्ये भरतकाम शिकत आहे.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 11:00 AM IST

मुंबई - Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या गरोदरपणाचे दिवस एन्जॉय करत आहे. ती वेगवेगळ्या कामात गुंतत असून तिनं आता इंस्टाग्रामवर तिच्या नवीन छंदाची एक झलक शेअर केली आहे. यामध्ये ती थ्रेड डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 16 एप्रिल रोजी दीपिकानं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आशा आहे की मी पूर्ण केलेली आवृत्ती शेअर करू शकेन!'' फोटोमध्ये दीपिकानं केलेलं भरतकाम दिसत आहे. यावर तिनं हिरव्या पानांसह फुलांच्या पाकळ्यामध्ये सुंदर असं कौशल्य आपले दाखवले आहे. ती सध्या भरतकाम शिकण्याचा प्रयत्न करत आहे.

दीपिका पदुकोण शिकत आहे भरतकाम : दीपिकानं बाळाच्या आगमनापर्यंत स्वत: ला निरोगी आणि व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तिनं भरतकाम शिकण्याचा निर्णय घेतला असून ती हे काम लवकरच शिकेलं असा सध्या दिसत आहे. दीपिकाच्या या कामाचे अनेकांनी कौतुक केले आहेत. तिनं केलेली एम्ब्रॉयडरी पाहून एका यूजरनं कमेंट विभागात लिहिलं, 'मला वाटते ही फुलकरी आहे, जेव्हा आई गरोदर असते आणि मुलाचे आगमन होते तेव्हा ही भेट मुलाला दिली जाते.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'दीपिका खूप हुशार आहे ती लवकरच हे काम शिकेल.' तसेच आणखी एकानं या पोस्टच्या कमेंट विभागात लिहिलं, 'तू भरतकाम अगदी योग्य करत आहे.' याशिवाय काहीजण या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी जोडत आहेत.

दीपिका पदुकोण वर्कफ्रंट : दीपिका या वर्षीच्या हिट चित्रपट 'फायटर'मध्ये शेवटी दिसली होती. ती लवकरच 'कल्की 2898 एडी'मध्ये साऊथ अभिनेता प्रभासबरोबर दिसणार आहे. आणखी पुढं ती 'लव्ह 4 एव्हर'मध्ये झळकेल. याशिवाय दीपिकाकडे रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर अजय देवगण, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, रणवीर सिंग आणि इतर कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 15 ऑगस्ट रोजी अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' बरोबर रिलीज होणार आहे. 'सिंघम अगेन' आणि 'पुष्पा 2'ची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. शिल्पा शेट्टीनं अष्टमी नवरात्रीला मुलगी समिशाबरोबर केलं कन्यापूजन , व्हिडिओ व्हायरल - Shilpa Shetty
  2. अनुष्का बाळासह भारतात परतली, पापाराझींपासून दूर ठेवला मुलांचा चेहरा - Anushka Sharma
  3. विक्रांत मॅसी स्टारर 'ट्वेल्थ फेल' चीनमध्ये 20 हजार स्क्रिन्सवर होणार रिलीज - 12th fail

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.