मुंबई - Deepika padukone Ranveer singh : दीपिका पदुकोण सर्वात लोकप्रिय हिरोइन्समध्ये गणली जाणारी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं आपल्या आपल्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली आहेत. आता ती तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. दीपिकानं प्रेग्नेंसीच्या घोषणेबरोबर सांगितलं होतं की, ती सप्टेंबर महिन्यात आई होणार आहे. आता काही दिवसापूर्वी रणवीर सिंगनं सोशल मीडियावरून त्याच्या लग्नाचे फोटो काढून टाकले होते, त्यामुळे दोघांमधील मतभेदाच्या बातम्या सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र दोघांमध्ये कोणतेही मतभेद झाले नाहीत. नुकतेच दोघेही सुट्टीवरून परतताना एकत्र दिसले.
रणवीर आणि दीपिकाचा व्हिडिओ व्हायरल : आता जोडप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. हे जोडपं एकत्र कारमधून बाहेर पडतात, तेव्हा दीपिका कॅमेराकडे पाहते आणि कॅमेरा लेन्ससमोर हवेत हात फिरवते. यावेळी रणवीर सिंग पांढऱ्या पोशाखात होता. तर दीपिकानं लांब तपकिरी टी-शर्ट घातला होता. या कॅमेऱ्यामध्ये त्याचा लूक पूर्ण टिपला गेला आहे. हे दोघेही यापूर्वी एकाच पोशाखात स्पॉट झाले होते. या जोडप्याचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या फोटोंमध्ये रणवीर आणि दीपिका फ्लाइटमधून खाली उतरताना दिसत होते. आजकाल हे जोडपं जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवण्याचा प्रयत्न करताना दिसतं.
दीपिका पदुकोणचं वर्कफ्रंट : दीपिका आणि रणवीर लवकर 'सिंघम अगेन' या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. दीपिकानं या चित्रपटाचं शूटिंगही पूर्ण केलं आहे. या चित्रपटात ती महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून तिची ॲक्शन स्टाइल चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटात दीपिकाचा पती रणवीर सिंग देखील आहे. 'सिंघम अगेन'च्या सेटवरील दीपिकाच्या बेबी बंपचा फोटोही व्हायरल झाला होता. यानंतर दीपिका प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. रम्यान दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती 'कल्कि 2898- ए.डी'मध्ये साऊथ स्टार प्रभासबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे.
हेही वाचा :
- 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये सोनाक्षी सिन्हानं तिच्या लग्नाबद्दल केलं भाष्य, जाणून घ्या सविस्तर - THE GREAT INDIAN KAPIL SHARMA SHOW
- फरहान अख्तरने शेअर केली 'डॉन ३' च्या शूटिंग लोकेशनची झलक - Farhan Akhtar Don 3
- प्रियांका चोप्रानं जॉन सीना स्टारर ॲक्शन कॉमेडी चित्रपटाचं शूटिंग केलं पूर्ण - priyanka chopra