ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोणच्या सोनोग्राफीचा डीपफेक फोटो व्हायरल, पाहा पोस्ट - Deepika Padukone And Ranveer Singh - DEEPIKA PADUKONE AND RANVEER SINGH

Deepika Padukone Sonogram Photo : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा एक फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये दीपिका हातात सोनोग्राफी रिपोर्ट धरून आहे.

दीपिका पदुकोण सोनोग्राम फोटो
Deepika Padukone Sonogram Photo (दीपिका पादुकोण(halimekucukk - x handle))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 5:38 PM IST

मुंबई - Deepika Padukone Sonogram Photo : हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण चालू वर्षात पालक होणार आहेत. दीपवीरनं फेब्रुवारी महिन्यात चाहत्यांना गरोदरपणाची गोड बातमी दिली होती. यानंतर या जोडप्यानं 2024 च्या कोणत्या महिन्यात डिलीवरी होणार असल्याचं देखील सांगितलं होत. दरम्यान दीपिकाच्या सोनोग्राफीचे रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये रणवीर आणि दीपिका एकत्र दिसत आहेत. तिच्या हातात तिनं सोनोग्राफी रिपोर्ट धरलेला आहे. या फोटोमगील आता काय सत्य आहे जाणून घ्या...

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण डीपफेक फोटो व्हायरल : दीपिकाच्या हातात पोलरॉइड आणि अल्ट्रासाऊंड रिपोर्ट आहे, सेलेब्समध्ये गर्भधारणेची घोषणा करण्याचा हा एक अतिशय ट्रेंडी मार्ग आहे. रणवीर आणि दीपिकाचा हा फोटो 13 मे पासून व्हायरल होत आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या व्हायरल फोटोमध्ये नाहीत. त्यांचा एआय तंत्रच्या माध्यामातून हा फोटो तयार करण्यात आला आहे. दरम्यान या फोटोवर अनेकजण कमेंट्स करताना दिसत आहेत. या फोटोवर एका चाहत्यानं लिहिलं, "रणवीर आणि दीपिकाचा हा फोटो फेक आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "मी दीपिका आणि रणवीरसाठी खूप खुश आहे, आता फक्त त्यांच्या मुलाला पाहायचं आहे." आणखी एकानं लिहिलं, "फोटो खूप सुंदर आहे." याशिवाय या फोटोवर अनेकजण हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

दीपिका कधी होणार आई? : दीपिकानं फेब्रुवारीमध्ये एक पोस्ट जारी करून तिच्या चाहत्यांना गरोदरपणाची गोड बातमी देऊन सर्वांना एक सुखद धक्का दिला होता. दरम्यान रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटी ती, 'फायटर' या चित्रपटामध्ये हृतिक रोशनबरोबर दिसली होती. आता पुढं ती 'कल्कि 2898-ए.डी'मध्ये साऊथ स्टार प्रभासबरोबर दिसणार आहे. याशिवाय ती रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये पती रणवीर सिंगबरोबर झळकणार आहे. दुसरीकडे रणवीर हा 'डॉन 3'मध्ये दिसेल. याशिवाय तो 'अंदाज अपना अपना 2', 'तख्त' आणि 'सिंबा 2 'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. जान्हवी-राजकुमार यांनी 'मिस्टर आणि मिसेस माही'तील 'देखा तेनू' गाण्यावर दिली पहिली प्रतिक्रिया - Mr and Mrs Mahi
  2. कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन'चं नवीन पोस्टर रिलीज - kartik aaryan
  3. विजयकांतना मरणोत्तर 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर रजनीकांत झाला भावूक - Rajinikanth

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.