ETV Bharat / entertainment

दलजीत कौरनं पती निखिल पटेल विरोधात केली तक्रार दाखल, लावले गंभीर आरोप - Dalljiet Kaur files FIR - DALLJIET KAUR FILES FIR

Dalljiet Kaur: टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरनं पती निखिल पटेलपासून विभक्त झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली आहे. पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत गंभीर आरोप केले आहेत.

Dalljiet Kaur
दलजीत कौर (instagram - Dalljiet Kaur)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 11:47 AM IST

मुंबई - Dalljiet Kaur: टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरनं पती निखिल पटेल विरोधात एफआयआर दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2 ऑगस्ट रोजी दलजीतनं मुंबईतील आग्रीपाडा पोलिस स्टेशनमध्ये पती निखिल पटेलविरोधात तक्रार दाखल करत विश्वासघाताचा आरोप केला आहे. केनियामध्ये राहणारा निखिल पटेल सध्या भारतात आहे. शुक्रवारी तो कथित गर्लफ्रेंडबरोबर मुंबई विमानतळावर दिसला होता. दलजीत कौरनं आपल्या पतीवर कायदेशीर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिनं याआधीही निखिलवर कारवाई केली होती. यावर्षी जूनमध्ये, तिनं तिच्या पतीविरुद्ध नैरोबी सिटी कोर्टात धाव घेतली होती. यानंतर निखिल पटेलला दलजीत आणि तिच्या मुलाला केनियातील घरातून बाहेर काढण्यापासून स्टे ऑर्डर दिला होता.

दलजीत कौरनं केलं निखिल पटेलवर गंभीर आरोप : यापूर्वी निखिलनं दलजीतला कायदेशीर नोटीस पाठवून त्याच्यावर छळवणूक केल्याचा आरोप केला होता. एका मुलाखतीत निखिल पटेलनं सांगितलं की, "दलजीतच्या एका पोस्टमध्ये माझे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचं म्हटलं, यानंतर अनेकांना वाटलं हे सर्व खर आहे, असा आरोप करणं हे चुकीचे होतं." दलजीत कौर आणि निखिल पटेलनं मार्च 2023 मध्ये पारंपारिक पद्धतीनं लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या 10 महिन्यांनंतर दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. एका मुलाखतीत निखिलनेही मे महिन्यात त्यांच्या विभक्त झाल्याची पुष्टी केली होती. आता दलजीत सर्व काही सोडून केनियाहून भारतात परतला आहे.

दलजीत कौरचं पहिलं लग्न : यानंतर दलजीत कौरनं म्हटलं होतं. "खूप काही सांगू शकते, पण मी माझ्या मुलामुळे गप्प आहे." दलजीतचं पहिलं लग्न 2009मध्ये अभिनेता शालीन भनोटबरोबर झालं होतं, ज्यापासून त्यांना एक मुलगा असून त्याचं नाव जेडन आहे. या दोघांनी 2015मध्ये घटस्फोट घेतला. दलजीत कौरनं याआधी शालिनवर देखील आरोप केले होते. दलजीतनं यावेळी शालीनवर घरगुती हिंसाचार, जीवे मारण्याचा प्रयत्न असे अनेक गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर दोघेही खूप चर्चेत आले होते. दलजीत कौरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं 'कुलवधू', 'इस प्यार को क्या नाम दूं' आणि ' काला टीका' या मालिकेत काम केलं आहे. याशिवाय ती 'नच बलिये'ची विजेती ठरली आहे. 2019 मध्ये, तिनं 'बिग बॉस 13' रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता.

हेही वाचा :

  1. Dalljiet Kaur and Nikhil Patel : टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर हनीमूनसाठी पोचली थायलंडला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.