ETV Bharat / entertainment

अखेर हार्दिक-नताशाचं नातं तुटलं; दोनदा लग्न करुनही चार वर्षांत मोडला 'संसार' - Hardik Natasa Divorce - HARDIK NATASA DIVORCE

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या घटस्फोट घेणार आहेत. खुद्द हार्दिकनं या वृत्ताला दुजोरा दिला. वाचा हार्दिकची सविस्तर पोस्ट....

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce
हार्दिक- नताशा (Source - Social Media File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 9:48 PM IST

Updated : Jul 18, 2024, 10:38 PM IST

हैदराबाद Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या घटस्फोट घेणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते वेगळे होत असल्याच्या बातम्या येत होत्या. नुकतीच नताशाही तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली होती. अंबानींच्या लग्नातही हार्दिक एकटाच मस्ती करताना दिसला. हार्दिकनं इंस्टाग्रामवर पोस्ट करत हा निर्णय दोघांसाठी किती कठीण होता हे सांगितलं.

काय केली पोस्ट? : आपल्या पोस्टमध्ये हार्दिकनं लिहिलं, "चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्पर संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि हे नातं वाचवण्यासाठी सर्व काही दिले. पण आता आम्हा दोघांसाठी हाच योग्य निर्णय आहे असं आम्हाला वाटतं. आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण, परस्परांचा आदर आणि एकमेकांचा सहवास, जे काही आम्ही एकत्र घालवलं आणि आनंद लुटला हे विसरु शकत नाही. आम्ही एक कुटुंब म्हणून पुढं गेलो."

मुलाची जबाबदारी कोणावर? : तसंच आपला मुलगा अगस्त्याची काळजी कोण घेणार हे देखील हार्दिकनं सांगितलं. त्यानं लिहिलं, "आमच्या आयुष्यात अगस्त्य असणं हे आम्ही भाग्यवान समजतो, जो नेहमी आमच्या जीवनाचा पाया राहील. आम्ही दोघं मिळून त्याची काळजी घेऊ. त्याला जगातील सर्व सुख मिळावं यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु आणि त्याच्या आनंदासाठी जे काही करता येईल ते करु. आम्हाला आशा आहे की तुमचा पाठिंबा मिळेल आणि या कठीण काळात आमची गोपनीयता समजून घ्या."

दोन लग्न आणि चार वर्षांचा संसार : हार्दिक पांड्यानं 31 मे 2020 रोजी मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केलं होतं. दोघांनी त्याच वर्षी 30 जुलै रोजी मुलाला (अगस्त्य) जन्म दिला. लग्नाच्या जवळपास चार वर्षांनी हार्दिक आणि नताशानं फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केलं. 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्तानं उदयपूरमधील डेस्टिनेशन वेडिंगमध्ये या दोघांनी लग्नाची पुनरावृत्ती केली. या लग्नाला त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. 14 फेब्रुवारी रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नाचे विधी पार पडले होते. तसंच त्याच्या एका दिवसानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं होतं.

हेही वाचा :

  1. Hardik Pandya Remarriage : हार्दिक पांड्याचे 'व्हॅलेन्टाईन डे'ला शाही थाटात दुसऱ्यांदा लग्न

Last Updated : Jul 18, 2024, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.