मुंबई - Crack trailer release : 'क्रॅक - जीतेगा तो जियेगा'चा धडकी भरवणारा टीझर आणि गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण केला होता, त्यानंतर चाहते या अॅक्शन स्पोर्ट्स ड्रामा ट्रेलरची प्रतीक्षा करत होते. देशातील अॅक्शन सुपरस्टार विद्युत जामवालने पॉवरहाऊस कलाकारांसह त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आज ९ फेब्रुवारी रोजी लाँच केला. चित्रपट निर्माता आदित्य दत्त दिग्दर्शित या चित्रपटात विद्युत जामवाल, अर्जुन रामपाल, नोरा फतेही आणि एमी जॅक्सन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हा चित्रपट जबरदस्त अॅक्शन, थ्रिल आणि विविध स्पोर्ट्स स्टंट यांनी खच्चून भरलेला आहे. हा भारतातील पहिला अॅक्शन स्पोर्ट्स ड्रामा असल्याचे प्रमोशन निर्मात्यांकडून सुरू आहे. उत्कृष्ट निर्मिती मूल्यासह हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
अभिनेता विद्युत जामवालने ट्रेलर लाँचच्या वेळी क्रॅक थीमवर आधारित गेम देखील लॉन्च केला. या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेता-निर्माता विद्युत जामवाल म्हणाला, "क्रॅक चित्रपटाच्या माध्यमातून, भारतीय चित्रपटातील सर्वात मोठा स्पोर्ट्स अॅक्शन थ्रिलर सादर करण्याचे माझे ध्येय होते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणणाऱ्या ध्येवेड्या टीमचा मी आभारी आहे. आम्ही तयार केलेले थ्रिल-पॅक व्हिज्युअल प्रेक्षकांना भुरळ घालण्याच्या उद्देशाने बनवले आहेत. यामुळे प्रेक्षक उत्सुकतेने चित्रपटाचा आणखी आनंद घेऊ शकतील."
दिग्दर्शक आदित्य दत्त म्हणाला, "क्रॅक हा विद्युतसोबतचा माझा दुसरा चित्रपट असून यावेळी अर्जुन रामपालही माझ्यासोबत आहे. अर्जुन रामपाल आणि विद्युत जामवाल हे वास्तविक जीवनात आणि रील लाइफमध्ये पुरुषत्वाचे प्रतीक आहेत. एक चित्रपट निर्माता म्हणून हा एक अप्रतिम अॅक्शन कॉम्बो आहे. दोघांचं स्फोटक आणि संतप्त व्यक्तिमत्त्वही प्रेक्षकांना आकर्षित करेल. या चित्रपटाचं विशेष हे आहे की, माझा हिरो फक्त अभिनेता नाही तर निर्माता देखील आहे! विद्युत आणि माझी दृष्टी जुळली यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी गोष्ट असू शकत नाही. मी आशा करतो आणि प्रार्थना करतो की आम्ही सिनेमाच्या जगात एक अद्भुत भागीदार म्हणून काम करत राहू."
विद्युत जामवाल आणि अॅक्शन हिरो फिल्म्स निर्मित, आदित्य दत्त लिखित आणि दिग्दर्शित, 'क्रॅक- जीतेगा तो जियेगा' 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -