ETV Bharat / entertainment

'मिर्झापूर सीझन 3'चा ट्रेलर होईल 'या' दिवशी रिलीज, पाहा तारीख - Mirzapur Season 3 Trailer - MIRZAPUR SEASON 3 TRAILER

Mirzapur Season 3 Trailer : 'मिर्झापूर सीझन 3'चा ट्रेलर हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. आज 18 जून रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओनं एक पोस्टर शेअर करून ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

Mirzapur Season 3 Trailer
मिर्झापूर सीझन 3 ट्रेलर ('मिर्जापूर सीजन 3' (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 1:00 PM IST

मुंबई -Mirzapur Season 3 Trailer : 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन सध्या खूप चर्चेत आहे. 'मिर्झापूर 3'ची नुकतीच पोस्टरसह घोषणा करण्यात आली आहे. तेव्हापासून चाहते 'मिर्झापूर सीझन 3'च्या रिलीजची वाट पाहत आहेत. 'मिर्झापूर सीझन 3' 5 जुलैमध्ये रिलीज होणार आहे. याआधी या क्राईम थ्रिलर सीरिजच्या ट्रेलर रिलीजची डेट समोर आली आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'मिर्झापूर सीझन 3'च्या ट्रेलरची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. याआधी निर्मात्यांनी 'मिर्झापूर 3'चं मल्टीस्टार पोस्टर देखील शेअर केले होते. दरम्यान या सीझनच्या ट्रेलर रिलीजची डेट जाहीर करताना निर्मात्यांनी लिहिलं, "छल कपट, शह-मात मिळेल, एक झलक खुर्चीच्या खेळाशी."

'मिर्झापूर 3' ट्रेलरची रिलीज डेट : 'मिर्झापूर 3'चा ट्रेलर 20 जूनला रिलीज होणार आहे. निर्मात्यांच्या कॅप्शनवरून हे स्पष्ट होत आहे की, या वेब सीरीजच्या ट्रेलरमध्ये एक मोठा धक्कादायक खुलासा होणार आहे. 'मिर्झापूर सीझन 3'ची रिलीज डेट 11 जून रोजी जाहीर करण्यात आली होती. या वेब सीरीजमध्ये पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल, अली फजल, श्वेता त्रिपाठी, हर्षिता गौर आणि विजय वर्मा कलाकार पुन्हा एकदा त्यांच्या दमदार शैलीत दिसणार आहे. 'मिर्झापूर 3'मध्ये काही नवे कलाकारही दिसणार असल्याचं बोललं जात आहे. यावेळी 'मिर्झापूर 3'मध्ये धमाका होताना दिसेल असे काही युजर्स पोस्टवर प्रतिक्रिया देऊन म्हणत आहेत.

मुन्ना भैयाची भूमिका : दरम्यानं यावेळी 'मिर्झापूर 3'मध्ये मुन्ना भैयाचं पात्र दिसणार नाही. मुन्ना भैयाची भूमिका दिव्येन्दु शर्मा साकारली होती. ही भूमिका अनेकांना आवडली होती. त्यामुळे अनेकजण ॲमेझॉन प्राइम व्हिडिओनं शेअर केलेल्या पोस्टवर मुन्ना भैयाबद्दल बोलताना दिसत आहेत. 'मिर्झापूर' आणि 'मिर्झापूर 2' ही वेब सीरीज अनेकांना पसंत पडली होती. दरम्यान 'मिर्झापूर' 2018मध्ये प्रदर्शित झाला होता. याशिवाय 'मिर्झापूर 2' हा 2023 ला प्रदर्शित झाला होता. या सीरीजचे दोन्हा भाग प्रेक्षकांना खूप आवडले होते. दोन्ही सीरीजमधील डायलॉग खूप जास्त प्रसिद्ध झाले होते. आता 'मिर्झापूर 3'ला प्रेक्षक किती पसंत करेल हे काही दिवसात समजेल.

हेही वाचा :

  1. नागा चैतन्यनं पोस्ट केलेल्या वडील नागार्जुनच्या थ्रोबॅक फोटोवर तब्बूची प्रतिक्रिया - tabu reaction
  2. 'पुष्पा 2' रिलीज पुढे ढकल्यानं चाहते नाराज, अल्लू अर्जुनच्या चाहत्यांच्या संयमाची सत्वपरीक्षा - Pushpa 2 The Rule Postponed
  3. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमधला रणबीर कपूरची मुलगी 'राहा'चा गोड फोटो व्हायरल - RANBIR KAPOOR DAUGHTER RAHA

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.