ETV Bharat / entertainment

कॉमेडियन भारती सिंगचं युट्युब पॉडकास्ट चॅनल हॅक, मागितली मदत - Comedian Bharti Singh - COMEDIAN BHARTI SINGH

Bharti Singh: कॉमेडियन भारती सिंगचं यूट्यूबवरील पॉडकास्ट चॅनल हॅक करण्यात आलं आहे. यासाठी तिनं आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून यूट्यूब इंडियाला मदत मागितली आहे.

Bharti Singh
भारती सिंग (भारती सिंग (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 5:53 PM IST

मुंबई - Bharti Singh : कॉमेडियन भारती सिंगचं यूट्यूब चॅनल - भारती टीव्ही नेटवर्क हॅक करण्यात आलं आहे. बुधवारी संध्याकाळी, तिनं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करताना गंभीर समस्येबद्दल सांगितलं आहे. भारतीनं आता यूट्यूब इंडियाला मदत मागितली आहे. तिनं सोशल मीडियावर आपला पती हर्ष लिम्बाचियाबरेबर व्हिडिओमध्ये म्हटलं, "आम्ही एका गंभीर समस्येचा सामना करत आहोत. यूट्यूब वरील आमचे पॉडकास्ट चॅनल भारती टीव्ही नेटवर्क हॅक झालं आहे. चॅनलचे नाव आणि तपशील बदलण्यापूर्वीच आम्ही याबद्दल अलर्ट केला होता. यूट्यूब इंडिया आमचं कंटेंट संरक्षित करण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. कृपया याचे निराकरण करण्यात आम्हाला मदत करा."

पॉडकास्टवर अनेक प्रसिद्ध व्यक्ती दिसल्या आहेत : भारती टीव्ही नेटवर्क हे भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया पॉडकास्ट चॅनल चालवतात. आतापर्यंत त्यांनी आपल्या शोमध्ये अनेक लोकप्रिय व्यक्तीना बोलवलं आहे. या शोला हर्ष आणि भारती होस्ट करतात. शोमध्ये नवाजुद्दीन शेखावत, अभिषेक कुमार, रोहित सराफ, एम्मी विर्ककिसम बाजवा, ओरी ओरहान अवत्रामणी आणि प्रियांक चौधरी हे कलाकार आले आहेत. पॉडकास्टच्या अलीकडील भागात अभिनेता रणदीप हुड्डा दिसला होता. भारती या एपिसोडदरम्यान तिच्या आवडत्या रणदीपच्या चित्रपटांबद्दल बोलली होती. यावेळी तिनं 'हायवे', 'सरबजीत' आणि 'जिस्म 2'बद्दल मजेशीर गोष्टी केल्या होत्या.

भारती सिंगनं मागितली मदत : ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजनंतर भारती सिंग प्रसिद्ध झाली. तिनं कॉमेडी सर्कससह इतर काही शोमध्येही भाग घेतला आहे. भारतीनं डिसेंबर 2017 मध्ये लेखक आणि निर्माता हर्ष लिम्बाचियाशी लग्न केलं. या जोडप्याला मुलगा गोला उर्फ लक्ष सिंग आहे. हे जोडपे 'नच बलिए 8' सह अनेक रिॲलिटी शोमध्ये एकत्र दिसले आहेत. त्यांनी 'खत्रा खत्रा खत्रा 'आणि 'डान्स दिवाने' यासह अनेक शोचे सूत्रसंचालनही केलंय. सध्या भारती 'लाफ्टर शेफ' या शोमध्ये दिसत आहे. हा शो अनेकांना आवडत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.