छतरपूर - Sanjay Dutt reached Bageshwar Dham : अभिनेता संजू दत्तची गणना ही बॉलिवूडमधील मोठ्या स्टार्समध्ये केली जाते. दरम्यान आता सोशल मीडियावर संजू दत्तचा एक व्हिडिओ आणि काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये तो पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याबरोबर दिसत आहे. शनिवारी संजय दत्तला अचानक छतरपूरमध्ये पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. संजय दत्तनं बागेश्वर धाम गाठून बालाजी महाराजांचे दर्शन घेतलं. यानंतर त्यानं बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. तसेच संजय दत्तनं बालाजीसमोर मस्तक टेकवून आशीर्वाद मागितला.
संजय दत्तचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : संजय दत्तनं मुंबई ते खजुराहो विमानतळापर्यंत विमानानं प्रवास केला. संध्याकाळी 6.30 वाजता पोहोचल्यावर धामच्या लोकांनी संजय दत्तचं स्वागत केलं. यानंतर तो कारनं बागेश्वर धाम येथे पोहोचला. संजय दत्तनं धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याबरोबर बराच वेळ संवाद केला. संजय दत्तनं बागेश्वर धामबद्दल म्हटलं, "देशातील आणि जगातील लोकांच्या श्रद्धेचे हे मोठे केंद्र आहे. येथील भाविकांची श्रद्धा पाहून मी भारावून गेलो. महाराजांना भेटून असं वाटलं की जणू मी त्यांना वर्षानुवर्षे ओळखतो. त्यांच्याबरोबर घालवलेला वेळ हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक आहे आणि मी पुन्हा पुन्हा बागेश्वर धामला येईन. हे एक अद्भुत ठिकाण आहे, बालाजीचं अद्भुत आशीर्वाद या ठिकाणी राहिले आहेत."
संजय दत्तचे आगामी चित्रपट : दरम्यान संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'हाऊसफुल्ल 5' चित्रपटामध्ये अक्षय कुमार, सौंदर्या शर्मा , नोरा फतेही, रितेश देशमुख, क्रिती सेनॉन, अभिषेक बच्चन, जॅकलीन फर्नांडिस, फरदीन खान आणि इतर कलाकारांबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तरुण मनसुखानी हे करणार आहे. सध्या हा चित्रपट खूप चर्चेत आहे. याशिवाय तो 'घुडचडी', 'केडी - द डेव्हल', 'द राजा साब' आणि 'डबल आयस्मार्ट' या चित्रपटांमध्ये झळकणार आहेत.
हेही वाचा :
- अंकिता लोखंडे आणि तिची सासू रंजना जैनचा मंदिरातील व्हिडिओ व्हायरल, यूजर्सनी केलं ट्रोल - Anikita Lokhande News
- दिलजीत दोसांझनं प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'मध्ये गायलं गाणं, प्रोमो रिलीज - Kalki 2898 AD First Song Promo out
- शरद पवारांनी माझं चुटकीसरशी केलं काम, अशोक सराफांनी सांगितली 'खास' आठवण... - ashok saraf