मुंबई - Chandu Champion BO Prediction : अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन' चित्रपट रुपेरी पडद्यावर 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 'चंदू चॅम्पियन' चित्रपट 'एक था टायगर' दिग्दर्शक कबीर खान यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट स्पोर्ट्स बायोग्राफीकल असल्यानं कार्तिकचे दोन वेगवेगळे रुप पाहायला मिळणार आहेत. 'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी कार्तिकनं खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन देशातील पहिला सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटातून कार्तिक आर्यन पहिल्या दिवशी कोटींची कमाई करणार, याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.
'चंदू चॅम्पियन'चं आगामी कलेक्शन : 'चंदू चॅम्पियन' हा कार्तिक आर्यनच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरेल की नाही याबद्दल काही दिवसात समजेल. कार्तिक आर्यनच्या या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. 'चंदू चॅम्पियन'च्या ओपनिंग कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट 15 कोटी रुपये कमाई करू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आजपर्यंत कार्तिक आर्यनच्या एकाही चित्रपटाला इतकी मोठी ओपनिंग मिळवता आलेली नाही. 'चंदू चॅम्पियन'चे बजेट 100 ते 140 कोटी रुपये आहे. कार्तिक आर्यननं या चित्रपटासाठी 25 कोटी रुपये फी घेतली आहे. 14 जून रोजी बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाला टक्कर देण्यासाठी कोणताही मोठा चित्रपट रिलीज होणार नाही. त्यामुळे या चित्रपटाला मोठा फायदा होणार आहे. याशिवाय अनेकांची नजर ही शनिवार व रविवारच्या कलेक्शनवर असणार आहे.
कार्तिक आर्यनचे सर्वाधिक ओपनिंग करणारे चित्रपट
'सत्यप्रेम की कथा' - 9.25 कोटी (ओपनिंग वीकेंड - 37.35 कोटी) (एकूण जगभरातील कलेक्शन - 117.77 कोटी)
'भूल भुलैया 2' - 14.11 कोटी (ओपनिंग वीकेंड - 55.96 कोटी) (एकूण जगभरातील कलेक्शन - 266.88 कोटी)
'लव आज कल'- 12 कोटी (ओपनिंग वीकेंड- 26 कोटी) (एकूण जगभरातील कलेक्शन- 52.63 कोटी)
'पत्ती पत्नी और वो' 9.10 कोटी (ओपनिंग वीकेंड- 35.94 कोटी) (एकूण जगभरातील कलेक्शन- 117.70 कोटी)
'लुका छुपी' – 8.01 कोटी (ओपनिंग वीकेंड 94.95 कोटी) (एकूण जगभरातील कलेक्शन - 111.87)
हेही वाचा :