मुंबई - Prashant Neil and Superstar Ajith : 'उग्रम', 'केजीएफ'चे दोन भाग आणि 'सालार' चित्रपटाला मिळालेल्या उत्तुंग यशानंतर प्रशांत नील हा आजच्या काळात सर्वाधिक मागणी असलेल्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. सुपरस्टार यश मुख्य भूमिकेत असलेल्या केजीएफ भाग 1 आणि 2 च्या प्रचंड यशानंतर प्रशंसित दिग्दर्शकाला महत्त्व प्राप्त झालं आणि त्यानं त्यानंतर निर्माण केलेल्या प्रत्येक अॅक्शन थ्रिलरचा दर्जी उंचावत गेला. दिग्दर्शक प्रशांत नीलनं पुन्हा एकदा त्याच्या 2023 च्या 'सालार'सह आपले वर्चस्व सिद्ध केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडले. लेटेस्ट अपडेटमध्ये प्रशांत नील आणि सुपरस्टार अजितच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे.
#AK and #PrashanthNeel are set to collaborate for two consecutive projects. Their second collaboration will mark the beginning of #PrashanthCinematicUniverse with climax leading to #KGF3. 🔥🔥🔥
— A ʀ ᴀ ᴠ ッ (@Araviii_kohlii_) July 24, 2024
OG (Billa , Mankatha, villain) Thala is backkk 🔥🔥🔥🔥pic.twitter.com/mbm8iEs4Vy
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता अजित आणि प्रशांत नील दोन चित्रपटांसाठी एकत्र काम करण्याच्या तयारीत आहेत. या चित्रपटाची निर्मिती होंबळे फिल्म्सचे विजय किरागांडूर करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, प्रशांत अजितसाठी सालार 2 नंतर सलग दोन चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. असं असलं तरी हे आगामी चित्रपट 'AK 64' आणि 'AK 65' आहे की '65' आणि '66' हे स्पष्ट झालेलं नाही.
रिपोर्ट्सनुसार, अजित आणि प्रशांत यांची भेट गेल्या महिन्यात 'विडामुयार्ची' शेड्यूल ब्रेक दरम्यान झाली होती. 'केजीएफ' मालिकेच्या दिग्दर्शकानं अजितकडे तीन वर्षांपेक्षा जास्त वेळ मागितला होता. असं मानलं जात की त्यांचा पहिला एकत्रित चित्रपट 'AK 64' असू शकतो आणि याची निर्मिती 2025 मध्ये होऊन 2026 मध्ये प्रदर्शित होऊ शकेल.
प्रसार माध्यमांच्या रिपोर्टनुसार दुसऱ्या चित्रपटाचा क्लायमॅक्स हा 'केजीएफ 3' साठीचं एक लीड असणार असून यातील अजित यांची व्यक्तिरेखा प्रशांत नील यांच्या आजवरच्या सिनेमॅटिक विश्वातील सर्वात मोठी असेल. 'केजीएफ'च्या आगामी भागात अजित स्क्रिन स्पेस शेअर करु शकतो असं संकेत यातून मिळत आहेत. या दोन दिग्गजांच्या एकत्र काम करण्याची अधिकृत घोषणा पुढील वर्षी मोठ्या धूमधडाक्यात केली जाणार आहे.
हेही वाचा -