ETV Bharat / entertainment

पायल मलिकच्या विभक्त होण्याच्या घोषणेनंतर 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये अरमान, कृतिकाला लागला झटका - BIGG BOSS OTT 3 - BIGG BOSS OTT 3

Armaan malik: पायल मलिकनं नुकतीच एक घोषणा केली होती की, ती लवकरच अरमान मलिकपासून वेगळी होणार आहे. यानंतर आता 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये एक पत्रकार परिषद घेण्यात आली, यामध्ये घटस्फोटाबद्दल अरमान आणि कृतिकाला सांगण्यात आलं होत.

Armaan malik
अरमान मलिक (kritika_malik - instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 5:12 PM IST

मुंबई - Armaan malik: 'बिग बॉस ओटीटी 3'मधील स्पर्धक सध्या खूप चर्चेत आहे. हा शो जसजसा ग्रँड फिनालेच्या जवळ येत आहे, तसतसे ट्रॉफीची शर्यतीमध्ये कोण विजयी होईल याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये काल रात्रीच्या भागात, एक पत्रकार परिषद झाली जिथे अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांना पायल मलिक ही त्याच्यापासून वेगळं होणार असल्याचं सांगण्यात आलं. हे ऐकताच दोघेही आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. यानंतर अरमानला पायल आणि कृतिकामधून कोणाला निवडशील हे जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यानं म्हटलं, "देवही उतरला तरी आमचं नातं बिघडणार नाही."

पायल अरमान मलिकपासून होणार विभक्त ? : बिग बॉसच्या घरातून एकदा बाहेर पडल्यावर तो आणि कृतिका पायलला समवणार असल्याचं त्यानं म्हटलं. यानंतर अरमानं सांगितलं, "हे नातं खरं आहे आणि त्यात कोणतीही फसवणूक नाही." आता सध्या अरमान, कृतिका आणि पायल मलिक यांच लग्न खूप चर्चेत आहे. अनेकजण या तिघांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करत आहेत. अरमानवर राष्ट्रीय टेलिव्हिजनवर बहुपत्नीत्वाचा प्रचार केल्याचा आरोपही करण्यात आला होता. यानंतर याबद्दल उत्तर देताना अरमाननं म्हटलं होतं, "आपले जीवन हे एक खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे आणि माझ लग्न स्वीकारण्याचं धाडस मला आहे." अरमाननं पुढं म्हटलं की, त्याच्या दोन्ही पत्नी लग्नापासून खुश आहेत, त्यामुळे त्याला जगाची काही पर्वा नाही.

पायल आणि अरमान मलिकच्या घटस्फोटावर झाली चर्चा : यानंतर बिग बॉसच्या घरामधील काही स्पर्धक त्याला प्रश्न विचारतात की, खरंच घटस्फोट होणार का? यावर अरमान म्हणतो, "माझं दोघांवरही खूप प्रेम आहे." हे ऐकून काही लोक हसतात तर काहीजण गोंधळात पडतात. पत्रकार परिषद झाल्यानंतर सना मकबूल आणि नेझीशी बोलताना अरमान म्हणतो की, "माझा पायलवर पूर्ण विश्वास आहे आणि ती कधीही वेगळं होणार नाही." कृतिका मलिकनं यावेळी म्हटलं, "मी गेल्या 7 वर्षांपासून या कमेंट्स ऐकत आहे." रणवीर शौरीशी बोलताना अरमाननं पायल आणि कृतिकाबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं की, "आम्ही तिघेही एकमेकांना समजून घेतो." यानंतर त्यानं असेही सांगितलं की, त्याला नॉमिनेट केलं गेलं आहे आणि 'बिग बॉस ओटीटी 3'च्या घरातून त्याला बाहेर जायचं आहे. त्याला ट्रॉफी नको असल्याचं त्यानं म्हटलंय. यानंतर कृतिका ही बिग बॉसच्या घरात एकटी बसून रडत असल्याचं दिसली. आता या शोचा कोण विजेता असेल हे काही दिवसात समजेल.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये पत्नी कृतिकाला पाहून अरमान मलिक संतापला, कारण काय? - Bigg Boss Ott 3
  2. बिग बॉस ओटीटीमध्ये राडा, विशाल पांडेच्या 'त्या' शब्दामुळे अरमाननं मारली झापड - Bigg Boss ott 3
  3. कृतिका मलिकनं धक्कादायक विधान; बिग बॉसमध्ये खळबळ, पती अरमान मलिकलाही धक्का - bigg boss ott 3

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.