मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'चा होस्ट रितेश देशमुख असून या शोचा ग्रँड फिनाले अगदी जवळ आला आहे. आता विजेत्याचे नाव जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. ट्रॉफी कोण जिंकेल याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. ग्रँड फिनालेपूर्वी सोशल मीडियावर विजेत्याचे नाव समोर आली आहेत. 'बिग बॉस मराठी 5' शो आधी 100 दिवस चालणार होता. मात्र हा शो आता 70 दिवसांमध्ये संपविण्यात येत आहे. 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन हा अनेकांना आवडत आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या विजेत्याच्या नावामध्ये कितपत सत्य आहे, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
विजेत्यांची यादी : 'बिग बॉस मराठी 5'मध्ये टॉप 8 स्पर्धक शिल्लक आहेत, यात अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, पॅडी कांबळे, धनंजय पोवार, वर्षा उसगावकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी यांचा समावेश आहे. दरम्यान, एक विकिपीडिया पेजचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार, अभिजीत सावंत 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता झाल्याचं दिसत आहे, तर अंकिता वालावलकर ही फर्स्ट रनर अप असल्याची या यादीत आहे. या स्क्रीनशॉटनुसार, सूरज, जान्हवी आणि निक्की तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. आता या स्क्रीनशॉटची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे.
काय आहे व्हायरल पोस्टचं सत्य? : अभिजीत सावंत खरोखरच 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता झाला आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनाला पडला असेल. 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महाअंतिम फेरीच्या रात्री विजेत्याचं नाव जाहीर केले जाईल. दरम्यान विकिपीडियावर अभिजीतचे नाव कसं आलं, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.'बिग बॉस मराठी 5'च्या विनर पेजवर कोणीतरी या शोबद्दलची ही माहिती शेअर केली आहे. विकिपीडिया एक मुक्त स्रोत आहे, यावर कोणीही माहिती संपादित करू शकतो. दरम्यान याप्रकरणी बिग बॉस निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे विजेत्याचे नाव जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना या शोचा ग्रँड फिनाले पाहावा लागणार आहे.
हेही वाचा :
- 'बिग बॉस'च्या घरात महाचक्रव्यूह टास्कसाठी पंढरीनाथ कांबळे आणि सूरज चव्हाण यांचा संघर्ष, नवीन प्रोमो रिलीज - BIGG BOSS MARATHI 5
- 'बिग बॉस मराठी 5'मध्ये अंकिता आणि वर्षाताई यांच्यात टास्क दरम्यान होईल लढत, नवीन प्रोमो व्हायरल - bigg boss marathi
- 'बिग बॉस मराठी 5'चा नवीन प्रोमो रिलीज, घरातील सदस्यांना 'बिग बॉस'च्या घोषेनंतर वाटली भीती - bigg boss marathi