ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'मधून अरबाज पटेल घरातून गेल्यानंतर सूरज चव्हाणनं दिला निक्की तांबोळीला पाठिंबा - bigg boss marathi - BIGG BOSS MARATHI

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' या शोमधून अरबाज पटेल हा घराच्या बाहेर गेला आहे. आता यानंतर निक्की तांबोळी ही स्वत:ला घरात एकटी झाली असल्याचं समजत आहे. यानंतर निक्कीला एकट पाहून सूरज चव्हाण तिची समजूत घालताना दिसत आहे. नवीन प्रोमो हा 'बिग बॉस' निर्मात्यांनी शेअर केला आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2024, 8:01 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'च्या घरात एका मागोमाग एक स्पर्धक जात आहेत. नुकत्याच आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकांरानी घरातील सदस्यांना काही प्रश्न विचारली होती. दरम्यान वैयक्तिक कामामुळे रितेश देशमुख हा परदेशात असल्यानं यंदाच्या आठवड्याचं एलिमिनेशन हे 'बिग बॉस' यांनी जाहीर केलं. शारीरिक दुखापतीमुळं 'बिग बॉस'च्या घरातून वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेल्या संग्राम चौगुलेनं आता एक्झिट घेतली आहे. संग्राम चौगुले हा घराबाहेर पडल्यानंतर, 'बिग बॉस'नं नॉमिनेट झालेल्या पाच सदस्यांना एलिमिनेशनसाठी ऍक्टिव्हिटी रुममध्ये बोलवून घेतलं. वर्षा उसगांवकर , जान्हवी किल्लेकर,सूरज चव्हाण, निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल या पाच सदस्यांपैकी एका स्पर्धकाला 'बिग बॉस'च्या घरातील प्रवास संपवावा लागणार होता.

अरबाज पटेल गेला 'बिग बॉस'च्या घरातून : या पाच सदस्यांपैकी सर्वात कमी मतं मिळालेल्या स्पर्धक अरबाज पटेल आहे. अरबाजच्या नावाचं एलिमिनेशन जाहिर झाल्यानंतर निक्की अरबाजला घट्ट मीठी मारून रडू लागली. 'बिग बॉस'च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून निक्की आणि अरबाज यांच्यात चांगली मैत्री पाहायला मिळाली. या शोमध्ये अनेकदा यांच्यात वाद देखील झाले. तरीही दोघांनी आपला वाद मिटवून एकत्र खेळ खेळला. अरबाजच्या एलिमिनेशनच्या घोषणेनंतर निक्की हतबल झाल्याची पाहायला मिळाली. यावेळी ती अगदी शेवटच्या क्षणापर्यत अरबाजला काढू नका अशी विनंती 'बिग बॉस'ला करताना दिसली. मात्र नियमानुसार अरबाजला बेघर व्हावं लागलं.

सूरजनं निक्कीला समजवलं : अरबाज बाहेर गेल्यानंतर निक्की घरात कशी खेळ खेळणार हे पाहण्यासाठी आता अनेकजण उत्सुक आहेत. आता इंस्टाग्रामवर एक प्रोमो 'बिग बॉस ' निर्मात्यांनी शेअर केला आहे. यामध्ये निक्की ही नाराज असल्याची दिसत आहे. व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये सुरज हा निक्कीला धीर देताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये सुरज हा निक्का म्हणतो, "तुझं कोणी नाही ना पण मी आहे." यावर निक्की देखील मान्य करत म्हणते की, "हो तू आहेस." यावर सूरज निक्कीला समजावून सांगत म्हणतो, "एकत्र बसायचं." यानंतर निक्की म्हणते, "तुझ्याबरोबर बसली आहे. कधी कोणासमोर हात जोडून भीक नाही मागितली की घरात थांबायचं आहे." यावर सूरज निक्कीला म्हणतो, "आता रडायचं नाही, सशक्त बनायचं." यावर निक्की म्हणते "हो मी मनापासून खंबीर आहे, पण हे दुःख कायम आहे. हे दुःख घेऊन पुढे कसं जायचं." यावर सूरज म्हणतो, "आपल्या भावना या डोळ्यातून बाहेर पडतात, जेव्हा आपला जवळचा माणूस आपल्याला सोडून जातो." यावर निक्की म्हणते, "यापुढचा प्रवास कठीण आहे." तेव्हा सूरज म्हणतो, "आपण एकटं आलो आहोत, एकटं घरी जाणार आहोत. आता गेमवर फोकस करायचा. खोटं बोलत नाही, मी रडणार, मला सुद्धा भावना आहेत, पण इथे एकट्यानेच खेळायचा आहे." यावर निक्कीही सहमती दर्शविते. यानंतर सूरज म्हणतो, "मग स्वतःला त्रास करुन घ्यायचं नाही." असं म्हणत तिची समजूत काढताना दिसतो. आता या प्रोमोवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत सूरजचं कौतुक करताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये पंढरीनाथ कांबळेनं वर्षा उसगावकरला कॅप्टन्सी टास्कदरम्यान चांगलच सुनावलं, प्रोमो व्हायरल - Bigg Boss Marathi 5
  2. अरबाज पटेल-संग्राम चौगुलेमध्ये होणार राडा, कॅप्टन्सी टास्कचा प्रोमो व्हायरल - bigg boss marathi
  3. बीबी करन्सी मिळविण्यात अरबाज पटेल आणि जान्हवी किल्लेकर झाले अयशस्वी, प्रोमो व्हायरल - Bigg Boss Marathi

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.