ETV Bharat / entertainment

बिग बॉसच्या घरातील सदस्यांना 'भाऊचा धक्का' नव्हे 'शॉक', नव्या प्रोमोनं वाढली उत्सुकता - bigg boss marathi - BIGG BOSS MARATHI

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' या शोमधील एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये रितेश भाऊच्या धक्क्यावर घरातील सदस्यांना प्रश्न विचारताना दिसत आहे. उत्तर चुकीचं असल्यानं सदस्यांना शॉक लागत आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2024, 1:52 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' हा शो आता खूप लोकप्रिय झाला आहे. या शोचा आता पाचवा आठवडा संपेल. शोच्या पहिल्या दिवसापासून दोन टीम घरात तयार झाल्या होत्या. आता या दोन्ही टीममध्ये फूट पाहायला मिळत आहे. घरातील अनेक सदस्य निक्की तांबोळीच्या विरोधात आहेत. दरम्यान काल रात्रीच्या एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनं याबाबत घरातील सदस्यांची कानउघडणी केली. याशिवाय अरबाजला देखील यावेळी रितेशनं चांगलचं सुनावलं. बिग बॉसच्या निर्मात्यांनी एक नवीन प्रोमो आता शेअर केला आहे. यामध्ये रितेश हा घरातील सदस्यांबरोबर बोलताना दिसत आहे.

बिग बॉसमध्ये घरातील सदस्यांना मिळेल शॉक : बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये रितेश घरातील सदस्यांना म्हणतो, "माणसं ओळखायला चुकलात तर शॉक बसतो." भाऊच्या धक्क्यावर रितेश हा घरातील सदस्याबरोबर एक खेळ खेळताना दिसणार आहे. या खेळात रितेश शॉक देणाऱ्या खुर्चीवर घरातील सदस्यांना बसायला लावतो. त्यांना काही प्रश्न विचारतो. जर या प्रश्नाचे उत्तर चुकीचे असले तर, सदस्याला शॉक दिला जातो. या खेळात घरातील सदस्यांची चांगलीच तारांबळ उडालेली प्रोमोत दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये घरातील अनेक सदस्यांना शॉक बसतो. हा खेळ खूप मनोरंजक असल्याचा दिसत आहे. याशिवाय अनेक चाहते या पोस्टवर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

'बिग बॉस मराठी 5'चा नवीन प्रोमो रिलीज केला : व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये रितेश विचारतो, "सूरज झापूक झुपुक हा डायलॉग किती वेळा म्हणत असतो." यानंतर पुढं तो म्हणतो, "निक्की दिवसातून किती वेळा लिपस्टिक लावते?" यानंतर या खेळाला कंटाळून थट्टेमध्ये वर्षा उसगांवकर या म्हणतात, "मला माझी शेवटची इच्छा विचारा." यानंतर घरातील सर्व सदस्य हसतात. दरम्यान शोमध्ये रितेशननं अभिजीत सावंत आणि निक्कीच्या मैत्रीबद्दलदेखील भाष्य केलं. भाऊच्या धक्क्यावर रितेशनं अभिजीतला पाठिंबा दिला. आज 1 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये देखील भाऊच्या धक्क्यावर कोणाची कानपिळी केली जाईल, याबद्दल अनेकांना आता उत्सुकता लागली आहे. या आठवड्यात व्होटिंग लाईन्स बंद आहेत. त्यामुळे एलिमिनेशनच्या बाबतीत बिग बॉसचा काय निर्णय होईल, यावर प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'च्या घराला मिळाला नवीन कॅप्टन, जाणून घ्या कोण? - Bigg Boss Marathi
  2. अभिजीत सावंत निक्की तांबोळीच्या बिग बॉसमधील गेममुळे नाराज, जोडीला जाणार तडा? - abhijeet sawant likely break jodi
  3. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये वाद झाल्यानंतर घरातील सदस्यांनी घेतली अरबाज आणि निक्कीची फिरकी - BIGG BOSS MARATHI

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.