ETV Bharat / entertainment

रितेश देशमुख 'भाऊचा धक्का', निक्की तांबोळीला कानशिलात लगावल्याबद्दल आर्या जाधवला फटकारलं - riteish deshmukh - RITEISH DESHMUKH

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' हा शो प्रचंड पसंत केला जात आहे. या शोमध्ये आर्या जाधवनं निक्की तांबोळीला कानशिलात लगावल्यानंतर आता रितेश देशमुख 'भाऊच्या धक्क्या'वर तिची शिकवणी घेताना दिसणार आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (Instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 14, 2024, 12:53 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' सध्या घरातल्या वादांमुळे खूप चर्चेत आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान आर्या जाधवनं निक्की तांबोळीच्या कानशिलात लगावली होती. यानंतर घरातील वातावरण खूप तापलं होतं. सध्या आर्याच्या सपोर्टला अनेक प्रेक्षक उभे असले तरीही तिनं या खेळाचा नियमभंग केला आहे. त्यामुळे तिच्यावर कडक कारवाई होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवीन प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोत भाऊच्या धक्क्यावर रितेश पुन्हा एकदा आर्याची शाळा घेताना दिसत आहे. आर्याबरोबर झालेल्या कारवाईमुळे घरातील स्पर्धकांनाही धक्का बसला आहे.

रितेशनं आर्याला फटकारलं : प्रोमोमध्ये आर्याला जेलमधून बाहेर काढण्यात आलं. यानंतर रितेशनं आर्याला म्हटलं की, "आर्या तुम्ही स्वत:ला काय समजता? तुम्हाला राग आला तर तुम्ही कोणावर पण हात उचलणार? आर्या तुम्ही जे केलं ते 100 टक्के जाणीवपूर्वक केलं होतं. आता मी 'बिग बॉस'ला विनंती करतो की, त्यांनी आपला निर्णय सांगावा." प्रोमोत आर्याच्या डोळ्यांतून अश्रू येताना दिसतात. आता हा प्रोमो सोशल मीडियावर खूप गाजत आहे. काही यूजर्स आर्याला पाठिंबा देत आहेत. आर्यानं हे कृत्य केल्यावर तिला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. आर्याला वाटलं होतं की, तिला 'बिग बॉस' काढून टाकतील. दरम्यान एखाद्याला मारहाण करणं हे 'बिग बॉस'च्या मूलभूत नियमांच्या बाहेर असल्यामुळे आर्यावर कारवाई होणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

आर्याला जनतेचा पाठिंबा : हा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आल्यानंतर यूजर्स यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर 'बिग बॉस'चा निषेध केला आहे. याशिवाय 'बिग बॉस' बघणं बंद करणार असल्याची देखील धमकी काही यूजर्सनं दिली आहे. एका यूजरनं या पोस्टवर लिहिलं 'आर्याला जर बाहेर काढलं, तर 'बिग बॉस' पाहणार नाही. दुसऱ्या एकानं लिहिलं, 'आर्यानं जे काही केलं ते शंभर टक्के बरोबर आहे, निक्कीला तिची जागा दाखवणं गरजेचं होतं. संपूर्ण महाराष्ट्र आर्याबरोबर आहे.' आणखी एकानं 'बिग बॉस' घरापेक्षा अरबाज आणि निकीचं लव्ह हाऊस झाल्याची टिप्पणी केलीय. दरम्यान 'बिग बॉस' खरंच आर्याला घराबाहेर काढेल का, हे आता हे अनेकांना जाणून घ्यायचं आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये आर्या जाधवनं कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की तांबोळीला लगावली कानशिलात - bigg boss marathi
  2. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये जान्हवी विरुद्ध वैभव, अरबाज आणि निक्की रंगणार सामना... कोण मारणार बाजी? - Bigg Boss Marathi 5
  3. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावंकर यांच्यात भाजीवरुन झाली झुंज - Nikki Tamboli VS Varsha Usgaonkar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.