ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'मध्ये निक्की तांबोळीनं सुरज चव्हाणचा पराभव करून फिनालेचं तिकिट जिंकलं... - BIGG BOSS MARATHI 5 - BIGG BOSS MARATHI 5

Nikki Tamboli : 'बिग बॉस मराठी 5' हा शो काही दिवसात संपणार आहे. आता या शेवटच्या आठवड्यात घरात धमाकेदार सेलिब्रेशन होणार आहे.

Nikki Tamboli
निक्की तांबोळी (Nikki Tamboli - Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2024, 7:07 PM IST

मुंबई- Nikki Tamboli : 'बिग बॉस मराठी 5'चा आता शेवटचा आठवडा बाकी आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये 'बिग बॉस मराठी 5'चा ग्रँड फिनाले होणार आहे. या ग्रँड फिनालेमध्ये कोण जिंकणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 'बिग बॉस'मध्ये काल तिकिट टू फिनाले टास्क झाला. या टास्कमध्ये निक्की तांबोळी सूरज चव्हाणला हरवून थेट बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचली. आता यानंतर घरातील सर्वांनी तिचं अभिनंदन केलय. काल 'बिग बॉस'चं एक घोषणापत्र घरात पाठवण्यात आलं होतं. हे पत्र अंकिता वालावलकरनं वाचलं. या पत्रात इनव्हेस्टमेंट बॉक्समध्ये ज्याचे पॉईंट्स जास्त असतील तो सदस्य तिकीट टू फिनालेचा उमेदवार असेल, असं म्हटलं होतं.

निक्की तांबोळी तिकिट टू फिनालेची उमेदवार : यानंतर निक्कीकडे 300 कॉईन्स असल्यानं तिला थेट उमेदवारी मिळाली. तिनं सूरजचा टास्कमध्ये पराभव केला. तिला तिकिट टू फिनालेची उमेदवारी मिळल्यानंतर घरातील काही सदस्य खुश झाले. आता तिचे चाहते आनंदी असल्याचं दिसत आहे. निक्की जेव्हा टास्क खेळत होती तेव्हा धनंजय पोवार हा तिचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत होता. या टास्कदरम्यान जान्हवी ही सूरजला पाठिंबा देताना दिसली. यानंतर निक्कीनं लक्ष केंद्रित करून कमी वेळात टास्कमध्ये बाजी मारली. या टास्कमध्ये सूरजला जरा वेळ लागला. टास्क सुरू असताना त्याच्यावेळी बझर देखील वाजला होता.

'बिग बॉस'च्या घरात होणार सेलिब्रेशन : 'बिग बॉस मराठी 5'मध्ये शेवटच्या आठवड्यात भव्य कार्यक्रम होणार आहे. बिग बॉस निर्मात्यांनी त्यासंदर्भात एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये घरातील सदस्य एका ठिकणी उभे राहून 'बिग बॉस'नं दिलेली सूचना ऐकताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' घरात भव्य सेलिब्रेशन होणार असल्याची घोषणा करताना दिसत आहे. याशिवाय आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये अभिजीत सावंत हा बिग बॉसच्या घरातील 'ट्रू जेंटलमॅन' असल्याचं सांगण्यात येत आहे. आता या प्रोमोवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही यूजर्स अभिजीतचं कौतुक करताना दिसत आहेत. याशिवाय काहीजण त्याला ट्रोल करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'घरात माझी किंमत 40 हजारांची नाही', टास्क दरम्यान जान्हवी किल्लेकरनं रडत पाटी तोडली... - janhavi cried during task
  2. ड्रामा क्वीन राखी सावंत 'बिग बॉस मराठी 5'मध्ये घेणार एन्ट्री - निक्की तांबोळीचा वाजणार बॅन्ड - bigg boss marathi 5
  3. 'बिग बॉस मराठी 5'च्या विजेत्यांची नावे आली समोर, व्हायरल पोस्टमागील जाणून घ्या सत्य... - BIGG BOSS MARATHI 5

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.