ETV Bharat / entertainment

अभिजीत सावंत निक्की तांबोळीच्या बिग बॉसमधील गेममुळे नाराज, जोडीला जाणार तडा? - abhijeet sawant likely break jodi - ABHIJEET SAWANT LIKELY BREAK JODI

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' हा शो अनेकांना आवडत आहे. या शोमध्ये अभिजीत सावंत हा निक्की तांबोळीच्या गेममुळे नारज झाला आहे. आता या दोघांची जोडी टिकून राहण्याची शक्यता कमी दिसत आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2024, 12:29 PM IST

मुंबई Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'च्या घरात रोजच प्रेक्षकांना वेगळं काही पाहायला मिळत आहे. सध्या घरात निक्की तांबोळी ही एकटी पडत असल्याचं दिसून येत आहे. घरातील काही सदस्य तिच्याविरोधात आहेत. अरबाज पटेल हा निक्की आणि अभिजीत सावंतच्या मैत्रीवर चिडलेला असल्याचं दिसून येत आहे. निक्की आणि अभिजीतच्या मैत्रीमुळे ग्रुप बीवर टीका होत आहे. दरम्यान आता बिग बॉस निर्मात्यांनी एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्य पातळलोकात सोन्याची नाणी शोधायला जाणार असल्याचं दिसत आहे. यानंतर सोन्याची नाणी शोधत असताना दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी होत आहे.

अभिजीत आणि निक्कीच्या जोडीला तडा? : प्रोमोत अरबाज आर्याला म्हणतो,"आर्या आपल्याकडे कमी सोन्याची नाणी आहेत. आता लवकर नाणी आण". यानंतर घराची कॅप्टन असलेली निक्की ही टीम बीनं जमा केलेली नाणी व्हॅलिड नसल्याचं म्हणते. यावर धनंजय पोवार उर्फ डीपी दादा आक्रमक होत म्हणतो,"खायला अन्न मिळेल त्या करन्सीवर".यानंतर अभिजीत म्हणतो, "यापुढे मला पार्टनर बनायचं नाही." अभिजीतच्या निर्णयामुळे घरातील सदस्य खुश होऊन त्याचं कौतुक करत, त्याला सॅल्युट करतात. सध्या घरात अभिजीत आणि निक्कीची एक जोडी आहे. मात्र निक्कीचा गेम पटत नसल्यानं अभिजीत तिला सोडत असल्याचा अंदाज आता लावला जात आहे.

निक्की तांबोळीला मिळला यूजर्सचा पाठिंबा : अभिजीतनं जर निक्कीबरोबरची जोडी तोडली तर बिग बॉस त्याला काय शिक्षा देतील, हे काही तासात समजेल. निक्कीची साथ अभिजीतनं सोडल्यानंतर ती घरात एकटी पडेल असं चित्र दिसून येत आहे. याशिवाय आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये अभिजीत हा नक्कीला समजवून सांगताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेकजण नक्कीला पाठिंबा देत आहेत. दरम्यान बिग बॉसच्या घरात आज काय वेगळं होणार यासाठी अनेकजण उत्सुक असल्याचं दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये वाद झाल्यानंतर घरातील सदस्यांनी घेतली अरबाज आणि निक्कीची फिरकी - BIGG BOSS MARATHI
  2. अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळीच्या मैत्रीमुळे अरबाज पटेल नाराज, घरात केला राडा - Bigg Boss Marathi 5
  3. 'बिग बॉस'च्या घरात कोल्हापूरचा रांगडा गडी करतोय 'कल्ला', धनंजय पोवारांची आई म्हणतेय 'आगे आगे देखिये होता है क्या...' - Bigg Boss Marathi 5

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.