ETV Bharat / entertainment

'बिग बॉस 18'मधील 'या' स्पर्धकाचा प्रवास संपला, आफरीन खान आणि रजत दलाल येईल आमनेसामने - BIGG BOSS 18

'बिग बॉस 18'मधून गधराज बाहेर पडल्यानंतर पहिल्या स्पर्धक घरातून बाहेर काढण्यात आला आहे. याशिवाय आज आफरीन खान आणि रजत दलाल यांच्यात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

Bigg Boss 18
बिग बॉस 18 ('बिग बॉस 18' (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 21, 2024, 12:22 PM IST

मुंबई - Bigg boss 18 : 'बिग बॉस 18'मध्ये एक आश्चर्यकारक ट्विस्ट आला आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या रिॲलिटी शोमधून पहिला स्पर्धक बाहेर पडला आहे. 'बिग बॉस'च्या घरातील प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर हेमा शर्मा शोमधून गेल्यानंतर घरातील अनेक सदस्य नाराज असल्याचे दिसले. खूप कमी वेळा हेमानं घरातील सदस्यांचे मनं जिंकली होती. सोशल मीडियावर हेमाची ओळख 'भाभी' म्हणून आहे. तिचे इंस्टाग्रामवर 2.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. आता हेमानं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये तिनं 'स्वेग से हुआ हमारा स्वागत.' असं पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिची ही पोस्ट आता सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे.

'बिग बॉस 18'मधून हेमा शर्मा बाहेर : तिच्या या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. हेमा शर्मा कमी मतांमुळे बेघर झाली. 'वीकेंड का वार' या एपिसोडमध्ये यावेळी भरपूर ड्रामा पाहायला मिळाला आहे. 'बिग बॉस 18'मध्ये अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा यांच्या पुन्हा एकदा वादावादी पाहिली मिळाली. याशिवाय सलमाननं पुन्हा एकदा स्पर्धकांना जोरदार फटकारलं आहे. यानंतर 'भाईजान'नं समजावून सांगितलं की, घरात राहायचे असेल तर प्रेमानं राहिले पाहिजे. याशिवाय 'वीकेंड का वार ' एपिसोडमध्ये, अंकिता लोखंडे, विकी जैन, कृष्णा अभिषेक आणि सुदेश लेहरी पाहुणे म्हणून आले होते, यांनी घरातील सदस्यांना मजेदार कार्य दिलं होतं.

'टाइम का तांडव' : 'बिग बॉस 18'चा रविवारचा एपिसोड हा खूप मजेशीर होता. या एपिसोडमध्ये 'बिग बॉस'नं अचानक हेमा शर्माला बाहेर काढण्याची घोषणा केली. तेव्हा सर्वांनी तिला मिठी मारली. 'टाइम का तांडव' फेरीत, घरातमध्ये सर्वोत्कृष्ट कॅप्टन कोण एक स्पर्धा झाली. यात विवियन डिसेना आणि रजत दलाल यांच्यात लढत झाली. यात रजत जिंकण्यात यशस्वी होतो. याशिवाय 'बिग बॉस 18'चा जसाजसा गेम पुढं जात आहे, तशातशा वेगवेगळ्या गोष्टी चाहत्यांना पाहायला मिळत आहे. आता 'बिग बॉस' निर्मात्यांनी एक प्रोमो रिलीज केला आहे. यात रजत दलाल आणि आफरीन खान यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस 18' मधील स्पर्धकांना त्यांचा नवीन नेता निवडण्याची संधी दिली जाणार आहे. या निवडणुकीत आफरीन आणि रजत आमनेसामने असतील, दोघेही घरातील सदस्यांसमोर आपली बाजू मांडताना दिसणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.