ETV Bharat / entertainment

'या' दिवसापासून सुरू होणार 'बिग बॉस 18', सलमान खानच्या शोचा नवा प्रोमो रिलीज... - bigg boss 18 premier date out - BIGG BOSS 18 PREMIER DATE OUT

Bigg Boss 18 Premier Date Out : अभिनेता सलमान खानच्या 'बिग बॉस 18' या शोच्या प्रीमियरची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावेळी 'बिग बॉस'च्या घरामधील थीम काय आहे हे जाणून घेऊया.

Bigg Boss 18
बिग बॉस 18 (बिग बॉस 18 (Promo Screen Grab))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2024, 2:07 PM IST

मुंबई - Bigg Boss 18 Premier Date Out : अभिनेता सलमान खानचा सर्वात लोकप्रिय टीव्ही रिॲलिटी शो 'बिग बॉसचा 18'चा सीझन हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता 'बिग बॉस 18'चा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. सलमानचे चाहते 'बिग बॉस 18'च्या प्रीमियरच्या तारखेची आतुरतेनं वाट पाहत होते. 'बिग बॉस 18 'कधी सुरू होणार याचा खुलासा सलमान खाननं केला आहे. 'बिग बॉस 18'च्या नवीन प्रोमोमध्ये सलमान खान खुप सुंदर दिसत आहे. नवीन प्रोमोमध्ये सलमान खान 'टाईमचा तांडव'वर अधिक लक्ष केंद्रित करत असून यावेळी स्पर्धकांचे भविष्य काय असेल यावर बोलत आहे.

'बिग बॉस 18'मध्ये नवीन काय ? : 'बिग बॉस 18'च्या नवीन प्रोमोमध्ये सलमान खान कोट आणि पॅन्टमध्ये दिसत आहे. प्रोमोमध्ये सलमान खान प्रेक्षकांना शोच्या थीमची ओळख करून देत असून त्यात नवीन काय असणार याबद्दल सांगत आहे. 'बिग बॉस 18'च्या नवीन प्रोमोमध्ये सलमान खान म्हणतो, "हे डोळे पाहतात पण आणि दाखवतात, फक्त आताची स्थिती, आता एक डोळा उघडेल , जो इतिहासाचा क्षण लिहिल आणि भविष्य देखील दाखवेल." 'बिग बॉस 18' च्या नवीन प्रोमोमध्ये सलमान खानच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झालं आहे की, यावेळी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारे निर्माते स्पर्धकांच्या मनात काय चालले आहे हे शोधतील. यावेळी 'बिग बॉस 18' आणखी मनोरंजक होणार आहे.

'बिग बॉस 18' कधी होणार प्रदर्शित : आजकाल 'भाईजान' हा त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'सिकंदर'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय तो 'बिग बॉस 18'चं देखील शूटिंग करत आहे. यावेळी देखील सलमान खान 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये येताना आणि घरातील सदस्यांची क्लास घेताना दिसणार आहे. दरम्यान सलमान खान स्टारर, 'सिकंदर' हा चित्रपट 2025 च्या ईदमध्ये रिलीज होणार आहे. 'बिग बॉस 18 'सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता कलर्स टीव्हीवर दिसेल. हा शो 6 ऑक्टोबरपासून प्रसारित होईल. आता अनेकजण या शोच्या रिलीजची खूप आतुरतेनं वाट पाहात आहेत.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस 18'च्या पहिला प्रोमोसह थीम रिलीज, सलमान खान करणार 'टाईमचा तांडव' - BIGG BOSS 18

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.