ETV Bharat / entertainment

मुनावर फारुकी आणि हिना खान म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार? व्हायरल व्हिडिओतून मिळाले संकेत - Hina Khan

Munawar Faruqui Hina Khan : बिग बॉस 17 चा विजेता मुनावर फारुकी टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खानसोबत काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. मुनावर आणि हिना कोलकाता येथे एका म्युझिक व्हिडिओसाठी शूट करत आहेत. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Munawar Faruqui Hina Khan
मुनावर फारुकी आणि हिना खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 7:06 PM IST

मुंबई - Munawar Faruqui Hina Khan : 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत अक्षरा सिंघानियाच्या भूमिकेमुळे घराघरी पोहोचलेली प्रसिद्ध असलेली टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान आणि बिग बॉस 17 चा विजेता मुनावर फारुकी एका प्रोजेक्टसाठी एकत्र येत आहेत. हे दोघे सध्या कोलकाता येथे शूटिंग करत आहेत आणि त्यांच्या एकत्र काम केल्याचा आनंद चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. हिना तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये शूटसाठी तयार होत असल्याचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ती आपली मेकअप करताना आणि नखांना नेलपॉलिश लावताना दिसत आहे.

विशेष म्हणजे, मुनावर फारुकी बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससह एक म्युझिक व्हिडिओ करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अद्याप या बातमीला दुजोरा मिळालेला नाही. अलीकडील बातम्या असे सूचित करतात की मुनवर आगामी म्युझिक व्हिडिओ प्रोजेक्टसाठी टेलिव्हिजन स्टार हिना खानसोबत टीममध्ये सामील होणार आहे. कोलकातामधील सध्याच्या शूटिंगच्या ठिकाणाने या उत्साहात भर टाकली आहे, सेटवरील व्हिडिओ आणि फोटोंनी ऑनलाइन चर्चा निर्माण केली आहे.

मुनावर फारुकीने बिग बॉस 17 च्या फायनलमध्ये अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे आणि अरुण माशेट्टी यांना मागे टाकत बिग बॉसचे प्रतिष्ठित शीर्षक मिळवले होते. कॉमेडियन मुनावर विजयाचा आनंद सेलेब्रिट करत आहे. त्याला एक नवीन कार, 50 लाखांचे रोख बक्षीस आणि एक चमकणारी ट्रॉफी देण्यात आली. रिअ‍ॅलिटी शोमधून बाहेर पडल्यापासून, मुनावर प्रसिद्धीच्या झोतात येत आहे, पार्ट्यांमध्ये हजेरी लावत आहे आणि त्याचा विजय साजरा करताना दिसत आहे.

मुनावर जेव्हा बिग बॉसचा विजेता ठरला होता त्यानंतर त्याचे मुंबईतील डोंगरीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले होते. यावेळी त्याच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला होता. त्याच्या या मिरवणुकीत बेकायदेशीर ड्रोन कॅमेरा वापरल्यामुळे त्याच्या एका उत्साही चाहत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यापूर्वी 'लॉकअप' या शोचाही मुनावर फारुकी विजेता ठरला होता.

हेही वाचा -

  1. पापाराझींवर भडकली रिया चक्रवर्ती, गमावला संयम
  2. 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या होम डेट नाईटला पाहता येतील असे रोमँटिक आणि हृदयस्पर्शी चित्रपट
  3. सलमान खान आणि निर्माता साजिद नाडियाडवाला ब्लॉकबस्टर ॲक्शन चित्रपटासाठी एकत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.