ETV Bharat / entertainment

'बिग बॉस 17'च्या ग्रँड पार्टीत मुनावर फारुकी 'जमाल कुडू'वर थिरकला, अरबाज खान झाला स्पॉट - arbaaz khan

Bigg Boss 17 Grand Party : 'बिग बॉस 17'चा सीझनचा फिनाले नुकताच पार पडला आहे. दरम्यान काल 9 फेब्रुवारी रोजी 'बिग बॉस' स्पर्धकांसाठी एका पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धेकांनी खूप एन्जॉय केला.

Bigg Boss 17 Grand Party
बिग बॉस 17ची ग्रँड पार्टी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 2:22 PM IST

मुंबई - Bigg Boss 17 Grand Party : अभिनेता सलमान खानचा सर्वात लोकप्रिय टीव्ही रिॲलिटी शो बिग बॉसच्या 17व्या सीझनचा फिनाले नुकताच पार पडला. या शोचा विजेता स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकी झाला. 'बिग बॉस 17' ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्यावर्ग खूप आनंदी आहे. अनेकांनी तो जिंकल्याचा आनंद व्यक्त करत काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. यानंतर मुनावर देखील आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी मुंबईतील डोंगरी विभागात गेला होता. यावेळी त्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेकजण आले होते. यानंतर त्यानं आपल्या कुटुंबाबरोबर बिग बॉस 17' जिंकल्याचं सेलिब्रेशन केलं होतं.

'बिग बॉस 17'ची पार्टी : दरम्यान काल रात्री 9 फ्रेब्रुवारी रोजी 'बिग बॉस 17' ची भव्य पार्टी झाली. या पार्टीला 'बिग बॉस 17'मधील सर्व स्पर्धक उपस्थित होते. पार्टीत पोहोचलेला 'बिग बॉस 17'चा विजेता मुनावर फारुकी चाहत्यांच्या गर्दीत पुरता हरवला. टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनबरोबर या पार्टीत पोहोचली होती. याशिवाय 'बिग बॉस 17'च्या पार्टीत अभिनेत्री मन्नारा चोप्रा, बिग बॉस 17 चा फर्स्ट रनर अप अभिषेक कुमार, समर्थ जुरेल, अभिनेता नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा, ईशा मालवीय पार्टीत आवर्जून उपस्थित राहिले. तर आयेशा खान, खानजादी आणि अनुराग डोवाल या पार्टीपासून दूर राहिले. याशिवाय अरबाज खाननं देखील पार्टी हजेरी लावली होती.

जमाल कुडूवर केला मुनावरनं डान्स : 'बिग बॉस 17'च्या ग्रँड पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, 'बिग बॉस 17'चा विजेता मुनावर 'ॲनिमल' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'जमाल कुडू' गाण्यावर डोक्यावर ग्लास घेऊन डान्स करताना दिसत आहे. यानंतर या व्हिडिओमध्ये पुढच्या क्षणी, सर्व स्पर्धक सलमान खानच्या 'मैने प्यार क्यूं किया' या चित्रपटातील 'जस्ट चिल' गाण्यावर नाचत आहेत. 'बिग बॉस 17'च्या पार्टीमध्ये मुनावरनं काळी पठाणी परिधान केली होती. या लूकमध्ये तो देखणा दिसत असून अनेकजण त्याचे कौतुक सोशल मीडियावर करताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. महेश बाबूनं नम्रता शिरोडकरला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ; शेअर केला फोटो
  2. मिथुन चक्रवर्ती यांच्यावर कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरू
  3. "भारत जगासाठी प्रेरणादायी..": मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.