मुंबई - Munawar Faruqui Gets Sachin Tendulkar Wicket : इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) ची रोमांचक सुरुवात झाली आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक प्रदर्शनीय सामना खेळला गेला. हा सामाना खूप रोमांचक होता. या सामान्यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळला. तसेच सामान्यामध्ये 'बिग बॉस-17'चा विजेता मुनावर फारुकीनं आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. आपल्या बॅटनं जादुई चौकार आणि षटकार मारणाऱ्या सचिन तेंडुलकरला फारुकीनं बाद केलं आहे. सचिन बाद झाल्यानंतर त्याला देखील विश्वास झाला नाही की, त्यानं त्याची विकेट घेतली गेली. सचिनं विकेट घेणं ही मोठी बाब आहे, त्यामुळे आता सोशल मीडियावर आता खूप चर्चा होताना दिसत आहे.
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग : नुकत्याच झालेल्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) सामन्यात मुनावर फारुकी आणि 'बिग बॉस ओटीटी सीझन 2'चा विजेता एल्विश यादव देखील मैदानावर एकत्र खेळताना दिसला. मुनावर गुलाबी जर्सीमध्ये तर इलेव्हन निळ्या जर्सीत त्याच्या संघाबरोबर दिसला. आता सचिनची विकेट घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सचिन आणि मुनावर मैदानात खेळताना दिसत आहेत. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आहे, ज्यामध्ये हिंदी आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील कलाकार मैदानात खेळत आहेत. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग10चे आयोजन 6 ते 15 मार्च दरम्यान ठाणे स्टेडियमवर होत आहे.
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा : इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग10मध्ये किमान 18 सामने होतील. यानंतर चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि नंतर या टीममध्ये फायनल पाहायला मिळेल. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या पहिल्या दिवसाच्या उद्घाटन सोहळ्यात अमिताभ बच्चन, सुरेश रैना, राम चरण, अक्षय कुमार असे काही सेलिब्रिटी आले होते. या सेलिब्रिटींनी 'नाटू नाटू' गाण्यावर देखील डान्स केला आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नुकताच सचिन तेंडुलकर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या कुटुंबासह जामनगरला पोहोचला होता. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात सचिननं खूप चांगला वेळ जामनगरमध्ये घालवला होता.
हेही वाचा :