ETV Bharat / entertainment

'भूल भुलैया 3'चा टायटल ट्रॅक रिलीज, कार्तिक आर्यनचे डान्स मूव्हीज अप्रतिम... - HARE RAM HARE RAM SONG

'भूल भुलैया 3'चा टायटल ट्रॅक रिलीज झाला आहे. या गाण्यात 'हे प्रभू ये क्या हुआ'ची धूनही जोडण्यात आली आहे.

Bhool Bhulaiyaa 3
भूल भुलैया 3 ('भूल भूलैया 3'चा टायटल ट्रॅक (Song Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 16, 2024, 4:36 PM IST

मुंबई - Bhool Bhulaiyaa 3 : 'भूल भुलैया 3'च्या बहुप्रतीक्षित टायटल ट्रॅकची प्रतीक्षा संपली आहे. आता या चित्रपटामधील टायटल ट्रॅक आज 16 ऑक्टोबर रोजी रिलीज करण्यात आलं आहे. यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. हा ट्रॅक रिलीज होताचं खूप गाजत आहे. कार्तिक आर्यन त्याच्या स्लीक, स्मूथ आणि 'स्पूकी स्लाइड' डान्स मूव्हसह स्क्रीनवर खूप आकर्षक दिसत असून अनेकजण या गाण्याचं कौतुक करत आहेत. 'हरे राम-हरे कृष्णा' या मंत्रात मिसळणारा आंतरराष्ट्रीय स्टार पिटबुलचा धमाकेदार रॅप हा या ट्रॅकला खास बनवत आहे.

'भूल भुलैया 3'मधील टायटल ट्रॅक रिलीज : टी-सीरीज आणि भूषण कुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत एक धमाकेदार सहयोग निर्माण करून इतिहास रचला आहे. या गाण्याला पंजाबी गायक दिलजीत दोसांझ पिटबुल, नीरज श्रीधर यांनी आपल्या खास शैलीत गायले आहेत. या गाण्याला संगीत तनिष्क बागची आणि प्रीतम यांनी दिलं आहे. हा ट्रॅक ग्लोबल बीट्स आणि देसी संगीतचे उत्तम मिश्रण आहे. भूषण कुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत खूप मोठे योगदान दिले आहे. या चित्रपटाबद्दल बोलाताना त्यांनी म्हटलं, "भूल भुलैया 3'साठी हे विशेष संगीत सहयोग सादर करताना आम्ही खूप उत्सुक आहोत. पिटबुल, दिलजीत दोसांझ आणि नीरज श्रीधर यांना एकत्र आणणे हे भारतीय चित्रपटसृष्टीत याआधी कधीही झाले नव्हते, प्रीतम आणि तनिष्क बागची यांनी बीट्स तयार केल्यानंतर, आम्ही बॉलिवूडमधील संगीत सीमा पार करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ट्रॅकमध्ये प्रत्येकाचा आवडता कार्तिक आर्यन आहे. त्याचे सर्वोत्कृष्ट डान्स मूव्हीज प्रत्येकाला आकर्षित करतील यात शंका नाही, हे सहकार्य माइलस्टोन आहे."

'भूल भुलैया 3' चित्रपटाबद्दल : अनीस बज्मी दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित, 'भूल भुलैया 3' बॉलिवूडच्या आवडत्या हॉरर-कॉमेडी फ्रँचायझीपैकी एक आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 1 नोव्हेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. 'भूल भुलैया 3' चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन व्यतिरिक्त विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी, राजपाल यादव, संजय मिश्रा, विजय राज आणि इतर कलाकार दिसणार आहे. यापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. हा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला होता.

हेही वाचा :

  1. कार्तिक आर्यननं दिलजीत दोसांझ आणि पिटबुलबरोबर टायटल ट्रॅकसाठी दिलं योगदान, पोस्ट व्हायरल
  2. 'भूल भुलैया 3' चं टॉप सिक्रेट : क्लायमॅक्समध्ये काय दडलंय कलाकारांसह टीमलाही नाही पत्ता
  3. 'भूल भुलैया 3'च्या ट्रेलरनं रचला इतिहास, व्ह्यूजच्या बाबतीत 'सिंघम अगेन'लाही टाकलं मागं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.