ETV Bharat / entertainment

पुन्हा एकदा मंजुलिकाची दहशत सुरु, 'भूल भुलैया 3'चा टीझर प्रदर्शित - bhool bhulaiyaa 3 - BHOOL BHULAIYAA 3

Bhool Bhulaiyaa 3 Teaser: अभिनेता कार्तिक आर्यन अभिनीत 'भूल भुलैया 3'चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये कार्तिक आणि विद्या बालन अनोख्या अंदाजात दिसत आहेत.

Bhool Bhulaiyaa 3 Teaser
भूल भुलैया 3चा टीझर (भूल भूलैया 3 (Film Poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 1:17 PM IST

मुंबई - Bhool Bhulaiyaa 3 Teaser: कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी आणि विद्या बालन स्टरर 'भूल भुलैया 3'च्या रिलीजची वाट अनेकजण पाहात आहेत. दरम्यान आज 27 सप्टेंबर रोजी 'भूल भुलैया 3'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. अनेकांना हा टीझर आवडला आहे. कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रूह बाबाच्या भूमिकेत आला आहे. याशिवाय विद्या बालननं पुन्हा एकदा मंजुलिकाच्या रुपात चित्रपटात प्रवेश केला आहे. यावेळी चित्रपटात रूह बाबा मंजुलिकाच्या दहशतीचा बळी ठरताना दिसेल, 'भूल भुलैया 3'चा टीझर खूपच धमाकेदार आहे. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.

कसा आहे टीझर ? : टीझरची सुरुवात मंजुलिकाच्या आवाजानं होते. यात ती म्हणते, "माझ सिंहासन तू तिला दिलं." त्यानंतर कार्तिक आर्यनचा आवाज येतो आणि तो म्हणतो, "काय वाटलं तुम्हाला कहाणी संपली असणार, दरवाजे तर बंद होतचं असतात." यानंतर मंजुलिकाचा भयानक आवज येतो, "किती वेळा सिंहासन माझ्यापासून हिसकावून घेशील." पुढं कार्तिक म्हणतो,"हा दरवाजा एक दिवस आणखी खुलेल." यानंतर विद्या म्हणते, "हे माझ सिंहासन आहे." पुढे कार्तिक आर्यनची टीझरमध्ये भव्य एन्ट्री होते. यात तो म्हणतो, "जग मूर्ख आहे जे भुतांना घाबरते." यानंतर तो स्वत: मंजुलिकाच्या महालात पोहोचतो. इथे तो मंजुलिकाच्या जाळ्यात अडकतो. यानंतर तृप्ती डिमरीची टीझरमध्ये एक झलक दिसते. टीझरच्या शेवटी कार्तिक त्याच्या एका मित्राजवळ म्हणतो की, "तिला रक्त दिसताच ती येते." यावर या चित्रपटाचा टीझर संपतो.

'भूल भुलैया 3' चित्रपटाबद्दल : हा चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप धमाल करेल असं सध्या दिसत आहे. कारण अनेकजण आता 'भूल भुलैया 3' पाहणार, असं या चित्रपटाच्या टीझर पोस्टवर म्हणताना दिसत आहेत. आता प्रेक्षक 'भूल भुलैया 3'च्या ट्रेलर आणि चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' हा चित्रपट रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ला टक्कर बॉक्स ऑफिसवर देणार आहे. 'भूल भुलैया 3' किती रुपेरी पडद्यावर धमाल करतो हे पाहणं लक्षणीय असणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलंय. 'भूल भुलैया 3' मध्ये कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी आणि विद्या बालन व्यतिरिक्त राजपाल यादव, विजय राज, माधुरी दीक्षित, संजय मिश्रा आणि इतर कलाकार असणार आहेत.

हेही वाचा :

  1. कार्तिक आर्यन अभिनीत 'भूल भुलैया 3'मधील मंजुलिका आणि रूह बाबाची झलक रिलीज, पाहा पोस्टर - horror comedy bhool bhulaiyaa 3
  2. 'भूल भुलैया 3चा फर्स्ट लूक' आउट, कार्तिक आर्यननं शेअर केलं नवीन पोस्टर - Kartik Aaryan
  3. 'भूल भुलैया 3चा फर्स्ट लूक' आउट, कार्तिक आर्यननं शेअर केलं नवीन पोस्टर - Kartik Aaryan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.