ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा टायटल ट्रॅक रिलीज - बडे मियाँ छोटे मियाँ

Bade Miyan Chote Miyan Title Song Out : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अभिनीत 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या टीमनं नुकताच चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज केला आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

Bade Miyan Chote Miyan Title Song Out
बडे मियाँ छोटे मियाँचा टायटल ट्रॅक रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 1:24 PM IST

मुंबई - Bade Miyan Chote Miyan Title Song Out: हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सध्या त्यांच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटासाठी चर्चेत आहेत. या दोन ॲक्शन हिरोची जोडी पहिल्यांदा एकत्र रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दरम्यान अक्षय-टायगर स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाचे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात दोघांची जोडी खूपच धमाकेदार दिसत आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये अक्षय आणि टायगरचे जबरदस्त स्टंट आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलंय.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अक्षय-टायगर जोडीनं खळबळ उडवून दिली : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अभिनीत 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचे टायटल ट्रॅक अनेकांना आवडलं आहे. आता अनेकजण या गाण्याचं कौतुक करताना सोशल मीडियावर दिसत आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ' गाण्यात दोघेही आपली परफेक्ट बॉडी फ्लाँट करताना दिसत आहेत. टायटल ट्रॅकमध्ये अक्षय आणि टायगरचे डान्स मूव्ह्स अप्रतिम असल्याचं अनेकजण म्हणत आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ' गाणं अनिरुद्ध रविचंदर आणि विशाल मिश्रा यांनी गायलं आहे. या गाण्याचे बोल इर्शाद कामिल यांनी लिहिले आहेत. याशिवाय 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या टायटल ट्रॅकला विशाल मिश्रानं संगीत दिलंय.

'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट कधी प्रदर्शित होणार : या चित्रपटाचे शीर्षक 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेता अमिताभ बच्चन आणि गोविंदाच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटावरून घेण्यात आलं आहे. हा चित्रपट अनेकांना खूप आवडला. 'बडे मियाँ छोटे मियाँ 2'मध्ये काहीतरी वेगळे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा आणि आलिया फर्निचरवाला यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 9 एप्रिल, 2024 रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं शुटिंग भारतात आणि परदेशातही झाले आहे. साऊथ अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये खलनायका भूमिका साकारत आहे.

हेही वाचा :

  1. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा विजय; सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव
  2. 'बाफ्टा अवॉर्ड्स 2024' मध्ये दीपिका पदुकोणने उपस्थितांवर घातली मोहिनी
  3. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' टायटल ट्रॅकचा टीझर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.