ETV Bharat / entertainment

बबिता फोगटने 'दंगल' फेम सुहानी भटनागरच्या प्रार्थना सभेला हजेरी लावली; केला शोक व्यक्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2024, 12:16 PM IST

Babita Phogat : 'दंगल' फेम अभिनेत्री सुहानी भटनागरच्या मृत्यूमुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दरम्यान काल सुहानीची प्रार्थना सभा पार पडली, ज्यामध्ये कुस्तीपटू बबिता फोगटने तिला श्रद्धांजली वाहिली.

Babita Phogat
बबिता फोगट

मुंबई - Babita Phogat : 'दंगल' फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचे लहान वयात निधन झाल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी निधन झालेल्या सुहानीने 'दंगल' चित्रपटात कुस्तीपटू बबिता फोगटची दमदार भूमिका साकारली होती. सुहानीच्या मृत्यूची बातमी आमिर खानला कळताच, त्याला धक्का बसला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सुहानीला श्रद्धांजली वाहिली होती. दरम्यान काल सुहानी भटनागरची प्रार्थना सभा पार पडली, ज्यामध्ये अनेक स्टार्स उपस्थित होते. यावेळी कुस्तीपटू बबिता फोगटनेही सुहानीच्या प्रार्थना सभेला हजेरी लावून तिला श्रद्धांजली वाहिली.

बबिता फोगटनं वाहिली सुहानीला श्रद्धांजली : सुहानीला श्रद्धांजली वाहत असताना बबिताचे डोळे पाणवले होते. बबिताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती भावूक झाल्याचे दिसत आहे. बबितानं सुहानी भटनागरच्या प्रार्थना सभामधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ''दंगल' चित्रपटात माझ्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या सुहानी भटनागरच्या निधनानंतर आज मी तिच्या फरीदाबाद येथील निवासस्थानी पोहोचले. तिला श्रद्धांजली वाहिली आणि तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत शोक व्यक्त केला. ओम शांती.'' सुहानीच्या घरी सध्या अनेकजण येऊन तिच्या पालकांना भेट देत आहेत.

सुहानीचा मृत्यू कसा झाला? : एका अपघातानंतर सुहानी तिच्या उपचारासाठी औषधे घेत होती. त्या औषधांच्या रिॲक्शनमुळे तिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार औषधांच्या दुष्परिणाम झाल्यामुळे सुहानीचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. 'दंगल' नंतर सुहानीनं स्वतःला फिल्म इंडस्ट्रीपासून दूर केले आणि तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले होते. ती तिच्या कॉलेजनंतर पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत परत येणार होती. पण सुहानी अशी अचानक जाईल, असे कुणालाही वाटले नव्हते. सुहानीला तिच्या चाहत्यांनी पोस्ट शेअर करून देखील श्रद्धांजली वाहली आहे. दरम्यान आमिर खान स्टारर 'दंगल' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 1968.03 कोटीची कमाई केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत आला होता.

हेही वाचा :

  1. अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी'नं ओटीटीवर केला विक्रम
  2. "मला ऐकू येतंय, मी बहिरा नाही..." म्हणत करण जोहरवर भडकला रणबीर कपूर, व्हिडिओ व्हायरल
  3. हळवी भावनिक प्रेमकथा असलेल्या 'ऊन सावली' चित्रपटाचा टीझर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.